Police case filed against BJP MLAs and activists Nashik news
Police case filed against BJP MLAs and activists Nashik news esakal
नाशिक

नाशिक : आमदारांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : कोरोना (Corona) नियमांसह पोलिस आयुक्तांनी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह दहा जणांवर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना फोन टॅपिंगप्रकरणी बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली. श्री. फडणवीस यांना दिलेली नोटीस आणि चौकशीचा राज्यभर भाजपकडून निषेध केला जात आहे.


नाशिक शहरातही भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त केला. नोटीस प्रतीची होळी करण्यात आली. या वेळी ‘ठाकरे सरकार हाय हाय, उद्धव ठाकरे हाय हाय’, ‘फडणवीस साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवली. केवळ आंदोलनाची परवानगी असतानाही मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवत जाळपोळ केल्याप्रकरणी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सुजिता करंजीकर, संगीता जाधव, वैशाली जाधव, सोनल दगडे, बबलू परदेशी, अशोक गोसावी, वसंत उशीर, गणेश कांबळे, अरुण शेंदुर्णीकर, पवन उगले यांच्यावर पोलिस कर्मचारी सतीश धनगर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT