Police Protection at MLA suhas kande office
Police Protection at MLA suhas kande office esakal
नाशिक

Nashik : बंडखोर आमदारांच्या निवास, कार्यालयांबाहेर पोलीस बंदोबस्त

नरेश हाळणोर

नाशिक : शिवसेनेतील (Shiv sena) बंडखोर आमदार परराज्यात असले तरी, त्यांच्या मतदार संघातील कार्यालय वा निवासाबाहेेर संतप्त शिवसैनिकांकडून आंदोलने करण्याची शक्यता आहे. तर काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील दोन आमदारांच्या निवास व कार्यालयांबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यात कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचा समावेश आहे. (Police escort out of rebel MLAs residences and offices Maharashtra political News)

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून, बंडखोर शिवसेना आमदारांविरोधात संतप्त शिवसैनिकांकडून आंदोलने केली जात आहेत. काही ठिकाणी संतप्त शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड केली आहे तर काहींच्या घरासमोर आंदोलनाचीही शक्यता व्यक्त होते आहे.

शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांमध्ये राज्याचे कृषीमंत्री व एकनाथ शिंदे समर्थक दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचा समावेश आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांचे निवासस्थान आणि कार्यालय मालेगावमध्ये आहे. तर, आमदार कांदे यांचे नांदगाव व नाशिकमध्ये निवासस्थान व कार्यालये आहेत. नाशिक ग्रामीण पोलीसांकडून मालेगाव आणि नांदगाव येथील आमदारांच्या निवास व कार्यालयांबाहेर एक पोलीस अधिकारी, महिला व पुरुष असा दहा जणांच्या पथकांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच, नियमित पोलीस गस्तही सुरू करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे, नाशिक शहर पोलीस आयुक्तालयांतर्गंत आ. कांदे यांच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयाबाहेर बॅरिकेटींग करून बंदोबस्त आणि आनंदवल्ली येथील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे.

"नाशिक शहरात आमदार सुहास कांदे यांचे निवासस्थान व कार्यालय आहे. त्याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त पहिल्या दिवसांपासून तैनात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जात आहे." - जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त, नाशिक.

"मालेगावातील ना. भुसे यांच्या निवास आणि कार्यालय तसेच, आमदार सुहास कांदे यांचे नांदगावातील निवास व कार्यालयांबाहेर कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे."

- चंद्रकांत खांडवी, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT