police find missing girl in hour nashik crime news 
नाशिक

Nashik News: पोलिसांच्या समयसुचकतेमुळे चिमुकली आईवडिलांच्या कुशीत

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: अलीकडच्या काळात लहान मुले बेपत्ता तसेच पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच फुलेनगर परिसरात हरवलेली दोन वर्षांची मुलगी पोलिसांच्या समयसुचकतेमुळे अवघ्या तासाभरात तिच्या आईवडिलांच्या कुशीत गेली.

पंचवटी पोलिसांनी सलग केलेल्या या कामगिरीने पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे बोलले जात आहे. (police find missing girl in hour nashik news)

दोन वर्षांची अश्विनी नावाची मुलगी बुधवारी (ता. ६) सायंकाळी सातच्या सुमारास पेठ रोडवरील वडारवाडी येथे रडत इकडेतिकडे फिरत होती. येथे राहणाऱ्या एका सुज्ञ महिलेने तिची विचारपूस केली असता, ती हरवली असल्याचे समजले.

त्या महिलेने तत्काळ अश्विनीला पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस हवालदार संदीप लांडे, पोलिस नाईक मच्छिंद्र गोसावी, पोलिस शिपाई भरत देशमुख, रोहिणी साबळे, फुलेनगर चौकीचे अंमलदार, पोलिस नाईक अनिल मोरे, पोलिस शिपाई आश्विन कुमावत, होमगार्ड मोहन यांच्या पथकास मार्गदर्शन करून तपास सुरू केला.

या तपासा दरम्यान दोन वर्षांच्या चिमुकलीचे वडील नरेंद्र रवींद्र पवार व त्यांची पत्नी रक्षा दोघेही फुलेनगर परिसरात शोध घेताना पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना पंचवटी पोलिस ठाण्यात आणून हरवलेली त्यांची मुलगी अश्विनीला सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले. सलग दुसऱ्यांदा अशी कामगिरी केल्याने पोलिसांकडे आशावादी नजरेने नागरिक बघत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT