Police Suraj Bijli Help women esakal
नाशिक

Nashik News :...अन् 'ती'च्या मदतीला धावली खाकी!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : विल्होळी परिसरात नवरा बायको च्या झालेल्या वादात नवऱ्याने बायकोला केलेल्या मारहानीची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेस अंबड पोलीस ठाण्याच्या बाहेर अचानक भोवळ आल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी प्रसंग पाहताच धाव घेत महिलेस उचलून तात्काळ पाणी पाजत नाश्ता करण्यासाठी स्वतः पैसे देऊ केले.

तर तिच्या पायास जबर मार लागलेला असल्याने खासगी वाहनात जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. (police help helpless wife beaten by husband at cidco Nashik News)

याबाबत अधिक माहिती अशी की 13 एप्रिल रोजी विल्होळी परिसरात राहणाऱ्या महिलेचे तिच्या नवऱ्याशी झालेल्या वादाची तक्रार करण्यास महिलेने थेट अंबड पोलीस ठाणे गाठले. महिला कदाचित सकाळ पासून उपाशी असल्याने अंबड पोलीस ठाण्याबाहेर तीस भोवळ आली आणि ती खाली कोसळणार अश्या वेळी ही बाब अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या लक्षात आली.

त्यांच्यां असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीस उचलून शेजारीच असणाऱ्या उपहार गृहात नेत पाणी देत चहा व नाष्टा करावीला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

इतकेच नाही तर तिला लागलेला मार लक्षात घेता तात्काळ खासगी वाहन उपलब्ध करून देत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले.यावेळी सदर प्रकार नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीतील असल्याने ग्रामीण पोलिसांना देखिल सूचित करून महिलेची व्यथा ऐकण्यास सांगितले.

एकीकडे पोलीस आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी होताना क्वचितच दिसत असताना मात्र या मुळे जमलेल्या समस्त नागरिकांमधून अंबड पोलिसांच्या या कृत्यामुळे कौतुक करण्यात येत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT