Lalit Patil Drugs Case Esakal
नाशिक

Lalit Patil Drugs Case: मोठी बातमी! ललित पाटील प्रकरणी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये.. आणखी एकाला केली अटक

पुणे पोलिसांनी काल दोन महिलांना अटक केली त्यानंतर आता आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांनी काल दोन महिलांना अटक केली त्यानंतर आता आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ललित पाटीलच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. लालितचा नाशिकरोडचा कारचालक मित्र सचिन वाघ याला पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरूत सचिन वाघ ललित पाटील सोबत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

ललित पाटील या प्रकरणात आता त्याच्या चालकाला मुंबई पोलिसांनी काल रात्री उशीरा अटक केली. सचिन वाघ (वय30) असं या चालकाचं नाव आहे. याला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.

ललित पाटील यांना पुण्यातील रुग्णालयातून पलायन केल्यानंतर सचिन वाघ याने विविध राज्य आणि जिल्ह्यात धावण्यासाठी मदत केली होती. गेल्या काही दिवसांपासून वाघ याने ललित पाटील यांना सतत मदत केल्याची माहिती आहे. त्यामुळे सचिन वाघ याला अटक करुन त्याची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत साकीनाका पोलिसांनी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ललित पाटील प्रकरणी दोन महिलांना केली अटक

ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणी पुणे काल पोलिसांनी दोन महिलांना अटक केल्याची माहिती आहे. या दोन महिला ललित पाटीलच्या मैत्रिणी असल्याची माहिती आहे. ललित पाटील ससून रूग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी त्यांच्या संपर्कात होत्या. या दोन्ही महिलांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे.

ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी काल अटक केल्यानंतर पुणे पोलिस देखील कसून तपास करत आहेत. त्यांनी नाशिकमधून दोन्ही महिलांना अटक केली आहे. ललित पाटील पळून गेल्यानंतर तो नाशिकला गेला होता. तो नाशिकला गेला तेव्हा त्याला या महिलांनी पैसै दिले सोबतच त्याची राहण्याची आणि पळून जाण्यासाठी देखील त्यांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

जमा झालेले पैसे, सोनं हे या दोन महिलांकडे होते अशी माहिती पोलिसांकडे आहे. आज या महिलांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. फरार असल्याच्या काळात तो सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता.ड्रग्सच्या काळया कमाईतून मिळवलेला पैसा ललित पाटीलने या दोघींकडे ठेवल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी नाशिक शहरातून दोघींनी अटक केली.

नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना

दरम्यान, ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील हे दोघे मूळचे नाशिकचे असून त्यांनी त्याठिकाणी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरु केला होता. या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे २०० किलो ड्रग्ज आढळून आल्याचा दावा करण्यात आला होता.

तत्पूर्वी ललित पाटील गेल्या नऊ महिन्यांपासून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देत तो पळून गेल्याचं सांगितलं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT