Police Bandobast esakal
नाशिक

Police Joint Patrol Campaign : दिवाळी सुटीत उद्योगांमधील चोऱ्या रोखण्याचे आव्हान!

नरेश हाळणोर

नाशिक : दिवाळी सुटीतील पर्यटनासह बाहेरगावी गेलेल्या कुटुंबांची घरे हेरून चोरटे चोरी करतात. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवस-रात्रीच्या गस्ती पथकात वाढ केली जाणार आहे. तसेच, सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्या बंद राहणार असल्याने सातपूर व अंबड पोलिस ठाण्यातर्फे दिवस-रात्र विशेष गस्ती पथके सक्रिय राहतील. उद्योजकांच्या निमा-आयमा संघटनांच्या मदतीने पोलिस संयुक्त गस्त मोहीम सुटीच्या काळात राबवतील. (Police Joint Patrol Campaign Challenge to prevent theft in MIDC during Diwali holiday Nashik News)

देशभर शुक्रवार (ता. २१)पासून दिवाळीला सुरवात होत आहे. बुधवारी (ता. २६) भाऊबीज आहे. सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्या या काळात बंद राहणार आहेत. तरी साधारणत: शनिवार (ता. २२) ते २९ ऑक्टोबरपर्यंत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर साडेचार ते पाच हजार कंपन्या असलेल्या औद्योगिक वसाहती चोरट्यांसाठी सुवर्णसंधी असते. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी ठाणेनिहाय बंदोबस्त आणि दिवस-रात्रीच्या गस्ती पथकांचे नियोजनाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दिवस-रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ होणार आहे.

अंबड- सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामगार वसाहत अधिक असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढते. औद्योगिक वसाहतीमध्येही कंपन्या बंद असताना चोरटे अंधाराचा फायदा घेऊन कंपनीच्या आवारातील साहित्य चोरून नेण्याचे प्रकार वाढतात. परंतु, काही वर्षांपासून पोलिसांच्या गस्ती पथकामुळे चोरीचे प्रमाण घटले आहे. यंदाही त्याचप्रमाणे नियोजन केले आहे. त्यासंदर्भात निमा-आयमा या औद्योगिक संघटनांची बैठक घेऊन पोलिसांतर्फे सुरक्षिततेसंबंधी सूचना उद्योजकांना देण्यात आल्या आहेत.

उद्योजक संघटना पुरविणार वाहने- सुरक्षारक्षक

* निमा-आयमा संघटनांकडून पोलिसांना गस्तीसाठी दुचाकी-चारचाकी वाहने पुरविण्यात येणार

* सातपूर, अंबड आणि मुख्यालयातील संयुक्त पथकासह दिवस-रात्र गस्त

* सिडको-सातपूर कामगार वसाहतीत पोलिस गस्त

* २० सुरक्षारक्षक पोलिसांसमवेत गस्तीवर राहणार

उद्योजकांना सूचना

* कंपन्यांमध्ये चोरट्यांकडून शिरकाव होण्याच्या जागा बंदिस्त कराव्यात, त्याची माहिती पोलिसांना द्यावी

* बंद असलेले स्ट्रीट लाइट सुरू करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा करावा

* नेमलेल्या सुरक्षारक्षकांची शहानिशा करावी

* सुरक्षारक्षकांचे ओळखीचे पुरावे घ्यावे

* कंपनी आवारातील सीसीटीव्ही कार्यान्वित करावे

सुरक्षा व्यवस्थेतील ठळक मुद्दे

* सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये क्यूआर कोड लावून दर दोन तासांनी बिट मार्शल करणार स्कॅन

* रात्र-दिवस दोन-दोन तासांनी गस्ती पथकांची एमआयडीसीत गस्त

* संशयित चोरट्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई

* सीआर व्हॅन, गस्ती पथकांची गस्त वाढविण्यावर भर

* ठिकठिकाणी नाकाबंदी करून कडेकोट तपासणी

* सुटीच्या काळात भंगारवाल्यांना एमआयडीसीत नो-एन्ट्री

संस्कृत सुविचार

उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः,

दैवेन देयमिति कापुरुषाः वदन्ति ।

दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या,

यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोषः।।

अर्थात, उद्यमी व्यक्तीकडे सदैव लक्ष्मी जात असते. मात्र उद्यमशील नसलेल्या व्यक्ती सर्व काही भाग्यावर अवलंबून आहे, असा विचार करतात. त्यामुळे भाग्याचा विचार न करता उद्यमशील व्हायला हवे. आपण प्रयत्न करूनही यश मिळत नसले, तर त्यात दोष असण्याचे

कारण नाही. संस्कृतमधील हा सुविचार चोऱ्या करून उदरनिर्वाह करू पाहणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

"पोलिस आणि उद्योजक संघटनांची संयुक्त बैठक होऊन त्यात दिवाळी सुट्टीतील बंदोबस्ताबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन केले जाईल. आयमा-निमाकडून २० सुरक्षारक्षक व वाहने पोलिसांना पुरविले जाणार आहे."

- निखिल पांचाळ, अध्यक्ष, आयमा

"औद्योगिक वसाहतीत कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी कृत्य घडू नये, यासाठी पोलिसांतर्फे बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उद्योजकांनीही कंपनीतील सीसीटीव्ही कार्यान्वित करावे. पोलिस आपल्यासोबतच आहेत."

- संजय बारकुंड, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT