Seized stolen goods and suspects. including the police esakal
नाशिक

Nashik Crime: पोलिसांनी 39 लाखाच्या मुद्देमालासह 15 संशयितांच्या आवळल्या मुसक्या

पोलिस तपास करत असताना शिपाई श्री. सावंत व श्री. सूर्यवंशी यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

सकाळ वृत्तसेवा

अंबड : एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी १५ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एक वर्षांपूर्वी सिमेन्स कंपनीत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

पोलिस तपास करत असताना शिपाई श्री. सावंत व श्री. सूर्यवंशी यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या. (Police nabbed 15 suspects along with Rs 39 lakh Nashik Crime)

चौकशीत त्याने साथीदारांसह कंपनीत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून २२ लाख रुपये किमतीचे कॉपर, ५ लाख रुपये किमतीचा जेसीबी, ६ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप, ६ लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या, १५ हजार रुपये किमतीची बाईक, ४ हजार रुपये किमतीचे कटर मशिन, ६ हजार रुपये किमतीचा व्हील बॅरो असा एकूण ३९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित संतोष शिंदे (४२, रा. दत्तनगर, अंबड), लक्ष्मीकांत उमाकांत होळकर (रा. लासलगाव, ता. निफाड), भारत शंकर मंजुळे (३४ रा. गुळवंच, ता. सिन्नर), संजय लक्ष्मण वानखेडे (३६, रा. सिंहस्थनगर, सिडको), शिवराम कैलास डहाळे (३७, रा. घरकुल योजना, अंबड) महेश्वर पद्मसिंग भंडारी (३५, रा. घरकुल योजना, चुंचाळे), जनार्दन बाळू गायखे (४३, रा. अंबड), विनोद कांतिलाल निकाळे (३२, रा. पंडितनगर सिडको), राजू गोविंद शेळके (४३, रा. अंबड), संजय अशोकराव वाणी (४०, रा. सिडको), जयेश कैलास पाटील (२३, रा. सातपूर), राहुल विश्वनाथ चंद्रकोर (२९, रा. उत्तमनगर, सिडको), महम्मद अल्ताफ महम्मद हुसेन चौधरी (३२, रा. अंबड), मुस्ताक शौकतअली शेख ऊर्फ भुऱ्या (३०, रा. पवननगर सिडको), हरीलाल रामलखन मौर्य (४३, रा. घरकुल योजना, चुंचाळे, अंबड) यांना ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाई प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे, उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक अनिल पाडेकर, सूर्यवंशी, समाधान चव्हाण, सुरेश जाधव, अर्जुन कांदळकर, दिनेश नेहे, अनिल कुऱ्हाडे, जनार्दन ढाकणे, महेश सावंत, श्रीकांत सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान किसान योजनेतून एकाच वेळी मिळणार 18,000 रुपये

Viral News: मुघल काळातील खजिना सापडला! चांदीच्या नाण्यांचा शोध, उर्दू-फारसीत कोरिव काम

Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनने ८ महिन्यांनंतर सांगितलं निवृत्तीमागचं खरं कारण...राहुल द्रविड समोर झाला भावूक!

Maharashtra Latest News Live Update : राज आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती-रामदास आठवले

Pune Crime : पुण्यात तरुण अभियंत्याचा निर्घृण खून, मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सुडाचा थरार; नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT