Nashik Police esakal
नाशिक

Nashik | पोलिस चौकीत रंगली दारू पार्टी; तक्रारदाराला मारहाण

विनोद बेदरकर

नाशिक : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डीकेनगर पोलिस चौकीत पार्टी करणाऱ्या पोलिसांनी तक्रारदाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघा पोलिसांची चौकशी सुरु असून या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

मयुर सिंग रघुनाथ ठाकूर, सागर बोधले आणि सुरेश जाधव आणि संशयित पोलिसांची नावे आहेत. त्यातील एकाला रात्रीच पोलिसांनी वैद्यकिय चाचणीला नेले तर इतर तिघे मात्र फरार झाल्याने त्यांची चौकशी सुरु असल्याचे समजते. स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर चौकीजवळ नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांना बोलावून घेतल्यानंतर मद्यपी पोलिसांची पळापळ झाली.

लाईट बंद करुन मारहाण

गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत डीकेनगर पोलिस चौकीलगत महापालिकेच्या उद्यानात कायमच टवाळखोरांच्या दारुच्या पार्ट्या चालतात. नशेत तर्रर झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना या मद्यपी टवाळखोराचा त्रास सुरु होतो. असाच प्रकार रात्री दहाच्या सुमारास सुरु असतांना टवाळखोरांच्या त्रासाने त्रस्त असलेल्या शांतीनिकेतन भागातील बाळासाहेब शिंदे हे त्रासाबाबत टवाळखोरांची तक्रार करायला पोलिस चौकीत गेले होते. तेथील दार बंद असल्याने त्यांनी दार उघडले. त्यावेळी मयुर सिंग यासह तेथील पोलिसांनी शुटींग करतो का असे म्हणत शिंदे यांना चौकीत घेउन तेथील लाईट बंद करुन मारहाण केल्याचे श्री. शिंदे यांनी 'सकाळ'ला सांगितले.

चौकशीनंतर कारवाई

दरम्यान याप्रकरणी वरिष्ठ आधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्फत संबधित प्रकाराची चौकशी सुरु असून वैद्यकिय अहवाल व सगळ्या प्रकाराची चौकशी केल्यानंतर त्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना अहवाल दिला जाणार आहे. शहर पोलिसांच्या प्रतिमेविषयी संबधित हा प्रकार असल्याने आमचे वरिष्ठांकडून योग्य ती दखल घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

''डीकेनगर पोलिस चौकीपासून काही अंतरावर शांतीनिकेतन पार्क येथे राहायला आहे. मद्यपीचा कायम आम्हाला त्रास असतो. मंगळवारी चौकीत तक्रारीसाठी गेलो होतो. मी दारु पार्टीची शुटींग करतो की काय अशी शंका आल्याने लाईट बंद करुन पोलिसांनी मला मारहाण केली. मध्यरात्री तीनपर्यत मी पोलिस ठाण्यात होतो.'' - बाळासाहेब शिंदे (स्थानिक तक्रारदार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : इचलकरंजीत घराची भिंत कोसळल्याने पाचजण जखमी

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT