Provincial Officer Babasaheb Gadve, Sub-Divisional Police Officer Sohail Sheikh etc. while releasing the reservation of Police Patil post for Yevla Nandgaon Taluka. esakal
नाशिक

Nashik: येवला, नांदगाव मधील पोलिस पाटील आरक्षण जाहीर; 26 सप्टेंबरपासून भरतीसाठी ऑनलाइन अर्जाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील प्रांताधिकारी कार्यालयांतर्गत येवला व नांदगाव तालुक्यातील ६१ पोलिस पाटलांची रिक्त पदे भरली जाणार असून यासाठीचे आरक्षण गुरुवारी (ता.२१) तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत निश्चित करण्यात आले.

दरम्यान या ठिकाणच्या पोलिस पाटील भरतीचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले असून २५ सप्टेंबर पासून या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. (Police Patil reservation announced in Yeola Nandgaon Online application for recruitment starts from 26th September Nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी नागरिकांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार पंकज मगर,निरंजन पराते आदींच्या उपस्थितीत सोडत निश्चित करण्यात आली.

यावेळी ठरल्याप्रमाणे गावे आरक्षित करतानाच लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी टाकून आरक्षणासह महिलांसाठीच्या जागा देखील निश्चित करण्यात आल्या.

अनुसूचित जातीसाठी राखीव गावे (पुरुष) : चिचोंडी बु, न्यारखेडे खुर्द, नागापूर बाणगाव बु, हिंगणदेहरे, पांझनदेव, धनेर, खिर्डीसाठे, वडाळी बुद्रूक, पिंपराळे, तळवाडे, हिसवळ खुर्द, एकवई.

अनुसूचित जाती (महिला) : न्यू पांझण, जउळके, देवळाणे, टाकळी बुद्रूक, नायगव्हाण.

विशेष मागास प्रवर्ग (पुरुष) : वडगाव बल्ले, देवठाण, एरंडगाव बुद्रूक, महिला : खिर्डी पा.

भटक्या जमाती अ साठी चंदनपुरी भटक्या जमाती ब साठी भौरी, पिंपळगाव लेप, सावरगाव पुरुषांसाठी तर हिसवळ बुद्रूक व मूळडोंगरी महिलांसाठी राखीव आहे. भटक्या जमाती क साठी चांदगाव पुरुषांसाठी व महालखेडा, पाटोदा महिलांसाठी राखीव तर भटक्या जमाती ‘ड’ साठी राजापूर राखीव झाले आहे.

इतर मागास प्रवर्ग (पुरुष) : पिंपरी, लौकी शिरस, गंगाधरी, फुलेनगर, कोळगाव, वाघाळे, सुरेगाव रस्ता, रेंडाळे, रणखेडा, मळगाव, कळमदरी, मुखेड, कोळम खुर्द, गोंडेगाव, आडगाव रेपाळ, मंगळणे, सावखेडे, घाडगेवाडी, देवदरी, निळखेडे, पारेकरवाडी.

इतर मागास प्रवर्ग (महिला) :वडाळी खुर्द, शास्त्रीनगर, मळगाव, भाटगाव, ललित, नारायणगाव, कानडी, भिंगारे, जळगाव बुद्रूक . खुल्या प्रवर्गासाठी गोपाळवाडी आरक्षित करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीसाठी १८, भटक्या जमातीसाठी ८, विशेष मागास प्रवर्गासाठी ४ तर इतर मागास प्रवर्गासाठी ३० गावे आरक्षित झाली आहेत.

वेळापत्रक जाहीर

दरम्यान, पोलिस पाटलांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया ही उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार २५ सप्टेंबरला उपविभागनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध होईल.

२६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या काळात उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार असून ९ ते १५ च्या दरम्यान छाननी होईल.तर २२ ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व इच्छुकांची नाशिक येथे पोलिस पाटील पदासाठीची परीक्षा होणार आहे.

त्यानंतर एक ते तीन नोव्हेंबरच्या दरम्यान तोंडी मुलाखत घेऊन अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT