police recruitment  esakal
नाशिक

Police Recruitment : पडताळणीनंतर पोलिस भरतीत 12 हजार 266 उमेदवार पात्र

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ग्रामीण पोलिस विभागात १६४ पोलिस शिपायांच्या जागांसाठी ग्रामीण पोलिसांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यासाठी २१ हजार ४९ अर्ज आले आहेत.पोलिस शिपाई पदासाठी १८ हजार ९३५ तर चालक पोलिस शिपाई पदासाठी २११४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. (Police Recruitment 12 thousand 266 candidates eligible for police recruitment after verification nashik news)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

जिल्हा ग्रामीण पोलिसांनी ९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पोलिस शिपाई भरतीसाठी आॅ नलाईन अर्ज मागविले होते. पोलिस शिपाई १६४ तर शिपाई चालक पदाच्या १५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर ही मुदत १५ डिसेंबरपर्यत वाढविण्यात आली.

त्यानंतर २ ते २० जानेवारी दरम्यान मैदानी स्पर्धेसाठी चाचणी घेण्यात आली. त्यात अर्ज केलेल्या २१ हजार ४९ उमेदवारापैकी १४ हजार ३२६ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील १२ हजार २६६ उमेदवार कागदपत्र आणि शारीरिक पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या चाचण्या पूर्ण झाल्या.

त्यात उमेदवारांना मिळालेले गुण त्याच दिवशी पोलिसांच्या संकेत स्थळावर प्रसिध्द झाले. उमेदवारांना काही तक्रारी असल्यास इच्छुकांनी पोलिस मुख्यालयाच्या ०२५३ ० २२००४०१ किंवा ९८२२९७४२५० या क्रमांकावर संर्पक साधावा असे आवाहान पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT