Police Recruitment esakal
नाशिक

Police Recruitment 2024 : भावी पोलिसांची अंतिम यादी जाहीर! भरतीसाठी मूळ कागदपत्रांसह बोलाविण्यात येणार

Nashik News : महाराष्ट्र पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ११८ भावी पोलिस शिपाई पदासाठीची अंतिम यादी शहर पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्या सहा -सात महिन्यांपासून महाराष्ट्र पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ११८ भावी पोलिस शिपाई पदासाठीची अंतिम यादी शहर पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे. वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी लवकरच केली जाणार आहे. (Police Recruitment 2024)

गेल्या डिसेंबर २०२३ पासून राज्यातील पोलिस दलातील रिक्त शिपाई पदांसाठीची भरतीप्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये मैदानी चाचणीची प्रक्रिया रखडली होती. निवडणुकीची आचारसंहिता संपताच गेल्या महिन्यापासून मैदानी चाचणीची प्रक्रिया पार पडली. तर, गत रविवारी (ता. ७) मैदानी चाचणीतून पात्र ठरलेल्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली.

त्यानंतर हरकती निकाली काढत आयुक्तालयाने बुधवारी (ता. १०) अंतिम ११८ जणांची तात्पुरती निवड यादी पोलिस आयुक्तालयाच्या nashikcitypolice.gov.in यावर जाहीर करण्यात आलेली आहे. या निवड यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह बोलाविले जाणार आहे. (latest marathi news)

यावेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्रांची छायाकिंत प्रत, सहा पासपोर्ट फोटो आणावा. तसेच, कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय चाचणीत उमेदवार अपात्र ठरल्यास तात्पुरत्या निवड यादीतून त्याचे नाव कमी केले जाईल. त्यासाठी उमेदवारास कोणताही दावा करता येणार नसल्याचेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT