police recruitment esakal
नाशिक

Police Recruitment : पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा लांबणीवर; पुण्यातील चाचणी लांबल्याने राज्यभर फटका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे. पुणे येथे भरतीसाठी सुरू असलेली मैदानी चाचणी फेब्रुवारीअखेर थांबविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील भरतीसाठी मैदानी चाचणी पार करून लेखीसाठी पात्र ठरलेल्यांना आणखी काही आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेसाठी एक हजार ८६१ उमेदवार पात्र ठरले आहेत. लेखी परीक्षा लांबणीवर पडल्याने या उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला आहे. (Police Recruitment Written Exam for Police Recruitment Postponed Due to delay of test in Pune whole state affected nashik news)

नाशिक ग्रामीणच्या १६४ रिक्त शिपाई पदासाठी २ ते २० जानेवारीदरम्यान, आडगाव येथील मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचण्यांचे निकाल प्रसिद्ध झाल्यावर उमेदवारांचे सामाजिक, समांतर आरक्षण व त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद पोलिसांनी केली.

काही उमेदवारांनी आक्षेप घेतल्यावर पडताळणी करून सदर दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यासंदर्भात ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने ३० जानेवारी व १० फेब्रुवारीला ई-स्वरूपात अहवाल प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार मैदानी चाचणीत ज्या उमेदवारांनी किमान ५० टक्के गुण मिळवले आहेत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

या उमेदवारांतून एका रिक्त पदासाठी दहा उमेदवार, यानुसार लेखी परीक्षेसाठी गुणवत्तायादी तयार करण्यात आली. त्यानुसार अंतिम लेखी परीक्षेसाठी एक हजार ८६१ उमेदवार पात्र ठरले आहेत. मात्र, राज्यभरात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई, पुणे व इतर ठिकाणी अद्यापही उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू आहे. निवडणुकांमुळे पुणे येथील मैदानी चाचणी फेब्रुवारीअखेरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे व बृहन्मुंबईतील मैदानी चाचणीचे निकाल जाहीर झाल्यावर लेखी परीक्षा होईल. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी महिनाभर लांबण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Mumbai News: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक, डॉक्टरांनी वाचवला जीव; गंभीर आजाराने ग्रस्त

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांनी माफी न मागता माफ कसं करता? संजय राऊत

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT