Mukesh Shahane, Bunty Tidme, Dilip Khaire esakal
नाशिक

Nashik Political: दोघा माजी नगरसेवकांना पोलीस सुरक्षा! मंत्रालयातून ‘फिल्डींग’; पोलीस संशयाच्या भोवऱ्यात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिडकोतील दोघा माजी नगरसेवकांसह एका भुजबळ समर्थकाला अचानक पोलीस सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

संबंधितांनी थेट राजकीय ‘फिल्डिंग’ लावून पोलीस सुरक्षा मिळविल्याची समजते. तर कोणताही ठोस मुद्दा नसताना संबंधितांना देण्यात आलेल्या सुरक्षेमुळे पोलीस यंत्रणेच्याच कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. (Police security for two former councilors Fielding from Ministry Police under suspicion Nashik Political news)

भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे महानगरप्रमुख व माजी नगरसेवक प्रविण उर्फ बंटी तिदमे या दोघांसह मंत्री भुजबळ समर्थक व समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे यांना शहर पोलीसांकडून सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

शहाणे, तिदमे यांना प्रत्येकी एक तर खैरे यांना दोन पोलीस अंमलदार सुरक्षेसाठी देण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या १४ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास सिडकोतील पवननगर येथे सराईत गुन्हेगार रोहित मल्ले याने हवेत गोळीबार केला होता. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हाही दाखल आहे. मात्र अद्यापही मल्ले यास अटक झालेली नाही.

तर गोळीबाराच्या घटनेवेळी माजी नगरसेवक शहाणे घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जाते. यानंतर, दुसऱ्याच दिवशी शहाणे व तिदमे यांनी नागपूर अधिवेशन गाठल्याचे समजते.

तिकडून आल्यानंतर त्यांनी आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत सुरक्षेची मागणी केल्याचे समजते. तसा अर्जही दिला.

त्यानंतरही पोलीस पातळीवरून प्रतिसाद न मिळाल्याने थेट मंत्रालयातूनच राजकीय फिल्डींग लावून पोलिसांवर दबाव आणून पोलीस सुरक्षा मिळवून घेतल्याचे समजते.

सत्तेच्या गैरवापराची चर्चा

यापैकी एका माजी नगरसेवकावर आत्महत्त्येस प्रवृत्त करण्यासह अन्य स्वरुपाचे गुन्ह्यांची नोंद आहे, तर पोलीस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या तिघांचीही पार्श्वभूमी पोलीस अधिकाऱ्यांना ठाऊक असल्याने त्यांनी पोलीस सुरक्षा न देण्याचीच भूमिका घेतली होती.

परंतु राजकीय दबावामुळे त्यांना सुरक्षा देण्यात आल्याचे समजते. परंतु यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तसेच, पोलीस सुरक्षा ‘मिरविण्यासाठी’च संबंधितांकडून पोलिसांचा वापर व सत्तेचा गैरवापर होत असल्याची चर्चा परिसरात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT