Crime esakal
नाशिक

Nashik Crime: गुन्हेशाखेच्या विशेष शाखेची मोठी कारवाई! काकड मळ्यातील जुगार अड्डा उद्ध्वस्त; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

मखमलाबाद येथील काकड मळ्यात चोरीछुपे सुरू असलेल्या जुगार अड्डा शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मखमलाबाद येथील काकड मळ्यात चोरीछुपे सुरू असलेल्या जुगार अड्डा शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला.

पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना ताब्यात घेत रोकड, मोबाइलसह चारचाकी कार असा 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर आयुक्तालयातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. (police special branch of crime gambling den demolished 29 lakhs worth of goods seized at kakad mala Nashik Crime)

शहर गुन्हेशाखेच्या विशेष शाखेचे उपनिरीक्षक दिलीप सगळे, हवालदार किशोर रोकडे यांना मखमलाबाद गावातील काकड मळा येथे सुरेश मुरलीधर काकड हा तिरट नावाचा जुगार खेळतो व खेळवित असल्याची खब मिळाली होती.

विशेष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी काकड मळ्यातील सुरेश काकड त्याच्या घराचे पाठीमागे वॉलकंम्पाऊंडजवळ मोकळया जागेत जुना चांदशी रोड या ठिकाणी पत्त्याचा जुगार अड्डा सुरू होता.

दबा धरून असलेल्या विशेष शाखेने त्यावर छापा टाकला. यावेळी सुरेश मुरलीधर काकड (५१, रा. मानसी महल, संभाजी चौक, मेनरोड, मखमलाबाद नाशिक), स्वप्नील रमेश मानकर (३०, रा. मानकर मळा, मखमलाबाद रोड), अनिल जगन्नाथ मानकर (५३, रा. राम मंदिराचे समोर, मखमलाबाद), दत्तु किसन सुर्यवंशी (४३, रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद), भगवान मोतीराम काकड (४०, रा. मखमलाबाद, नाशिक), रविकांत गणपत गामणे (४०, रा. कुंभार गल्ली, मखमलाबाद), अक्षय सुनिल काकड (३८, रा.. मानकर मळा, मखमलाबाद), विश्वनाथ प्रकाश काकड (४६, रा. मानकर मळा, मखमलाबाद), प्रकाश देवराम पिंगळे (४०, रा. मखमलाबाद), विशाल ज्ञानेश्वर काकड (३४, रा. मखमलाबाद), सुनिल रघुनाथ काकड (५०, रा. काकड मळा, मखमलाबाद) यांना जागेवरून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडुन ७६ हजार २२० रुपयांची रोकड, ७८ हजारांचे मोबाईल), २७ लाख ९० हजारांच्या चारचाकी कार असा एकुण २९ लाख ४४ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी अंमलदार भगवान जाधव यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवून आरोपींवर म्हसरूळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, उपनिरीक्षक दिलीप भोई, दिलीप सगळे, किशोर रोकडे, भामरे, डंबाळे, भुषण सोनवणे, योगेश चव्हाण, दिघे, भगवान जाधव, या पथकाने कामगिरी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT