IG B G Shekhar esakal
नाशिक

Police Transfer : विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची बदली रद्द!

नरेश हाळणोर

नाशिक : गेल्या आठवड्यात करण्यात आलेली नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांची बदली रद्द करण्यात आली. तर, सुनील फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. शासनाने तसे नवीन आदेश जारी केले आहेत. (Police Transfer Special Inspector General of Police BG Shekhar transfer cancelled Nashik News)

महाराष्ट्र शासनाच्या सहसचिवांनी गेल्या आठवड्यात राज्यातील ३६ पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांची बदली करण्यात आली होती. तर त्यांच्या रिक्त जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र, शेखर यांची पदस्थापना करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, शनिवारी (ता. १७) दुपारी शासनाने नव्याने बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नव्याने बदली आदेश दिले आहेत. तर, शेखर यांची बदली रद्द केली आहे. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बी.जी. शेखर हेच कायम राहतील.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

या बदल्यांमध्ये सुधारित पदस्थापनेनुसार, अमिताभ गुप्ता, रंजनकुमार शर्मा, संजय मोहिते, सुरेशकुमार मेंगडे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रवींद्र शिसवे यांची लोहमार्ग (मुंबई) येथे पोलीस आयुक्त म्हणून बदली केली आहे. तर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी-चिचवड येथे पोलीस सहआयुक्तपदी बदली केली असून, बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुहास वारके व संजय दराडे यांच्याही पदस्थापना करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT