death esakal
नाशिक

नाशिक : युवतीचा संशयास्पद मृत्यू; लवजिहाद असल्याचा आरोप

राजेंद्र अंकार

सिन्नर (जि. नाशिक) : शहरातील शिवाजीनगर भागातील एका पंचविस वर्षीय युवतीचा झालेला मृत्यू (Death) संशयास्पद असून तिने आत्महत्या (Suicide) केलेली नसून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करीत सर्वपक्षिय पदाधिकाऱ्यांनी आज पोलिसांना निवेदन दिले. तिच्याकडे वांरवार येणारा कोण होता याबाबत सर्वांसह पोलिसांना माहिती असूनही ते याबाबत दुर्लक्ष करीत असून संशयिताला बचावाची संधी देत असल्याचा सनसनाटी आरोपही करण्यात आला आहे. हा प्रकार लव जिहादचा (Love Jihad) असून संबंधित संशयिताला अटक करुन कारवाई करावी अशी मागणी पदाधिका-यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणी शुक्रवारी (ता.७) दुपारी बाराला वावी वेस येथून बसस्थानकापर्यंत सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात येणार असून रास्तारोकोही करण्यात येणार आहे.

पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार २८ डिसेंबरला शहरामधील शिवाजीनगर भागातील किरण राजू सानप (२५) ही ती राहत असलेल्या घरात मृतावस्थेत आढळली. सायंकाळी सातच्या सुमारास आजूबाजूच्या रहिवाशांच्या ही बाब लक्षात आली. स्थानिक नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस आले. त्यांनी तिची लहान बहिण लासलगावडून आल्यानंतर मृतदेह खाली उतरविला व नंतर अंत्यविधी करण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद ३० डिसेंबरला केली.

ती गर्भवती होती ?

निवेदनात पुढे म्हटले आहे की मुळातच युवतीने आत्महत्या केलेली नसून तिचा मृत्यू संशयास्पद असून लव जिहादचे प्रकरण आहे. किरण ही मोठ्या बहिणीसोबत राहात होती. त्या बहिणीचे १७ डिसेंबरला लग्न झाले. त्यानंतर तेथील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार रईस इब्राहीम शेख हा नेहमी किरणला भेटायला येत असे. आजूबाजूच्या रहिवाशांनी त्याला टोकल्यानंतर सुध्दा त्याने घरी येणे जाणे चालूच ठेवले. तो तिच्या घरी येऊन तिला धमकावून तिच्यावर अत्याचार करीत होता. त्यातून किरण गर्भवती राहिली होती असे सांगण्यात येते. त्या वादातूनच तिची हत्या झाली आहे, या सर्व प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी संशयित आरोपी कोण हे सर्वांच्या लक्षात येत असताना पोलिसांनी त्याची साधी चौकशीही केलेली नाही.

अनेक अनुत्तरित प्रश्‍न

युवतीच्या मृत्यूबाबत सारेच संशयास्पद असून शवविच्छेदन अहवाल पाच दिवसापासूनही आलेला नाही. आत्महत्या राहत्या घरात केली मात्र दरवाजा उघडाच होता, तिच्या तोंडातून फेस आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संशयित पोलिसांच्या मर्जीतील असल्याचीही चर्चा सुरू आहे. प्राथमिक अहवालानुसार गळफास घेवून आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.दरम्यान सर्वपक्षियांच्या आक्रमक भूमिकेनंतर आज रात्री उशिरापर्यंत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिस हवालदार नवनाथ पवार यांनी सांगितले.

खुनाचा गुन्हा दाखल करावा

सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेमध्ये या घटनेबदल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. किरणवर अत्याचार करणाऱ्याला तातडीने अटक करावी, कलम ३७६ व ३०२ अंतर्गत बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. गुन्हेगारास फाशीची शिक्षा होईपर्यंत पोलिसांनी पाठपुरावा करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जयंत आव्हाड,रमेश नागरे,भाऊसाहेब शिंदे,कृष्णा दराडे,राजाराम मुरकुटे, विनायक सांगळे, मंगला झगडे, उर्मिला लासूरकर, रोहिणी कुरणे, वंदना लासूरकर, रुपाली काळे, सविता कोठुरकर, सुमन जोशी, कुणाल हांडे आदींच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT