Adv Manikrao Shinde esakal
नाशिक

Nashik Political News: ऑडिओ क्लीप व्हायरल करण्याची राजकीय खेळी! माणिकराव शिंदेंचा आरोप

राजकीय फायद्यासाठी इतर समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

येवला : आता ओबीसींचे काही खरे नाही. त्यांनी गावागावांत बुलडोझर फिरवला, ‘करेंगे या मरेंगे’ ही भूमिका घ्यावी लागेल, या आशयाची मंत्री छगन भुजबळ यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. मात्र, या मागेही राजकीय खेळी आहे. आपली अडचण झाल्याने राजकीय फायद्यासाठी पुन्हा इतर समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.

ओबीसींमध्येही प्रत्येक पक्षात नेतृत्व तयार झाले असून, त्यांची ओबीसी नेतृत्वाची एकमुखी भासवणारी भूमिकाही किती बेगडी आहे., हे येवला मतदारसंघाने चांगलेच ओळखले आहे, असा आरोप शरद पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ॲड. माणिकराव शिंदे यांनी केला आहे. (political ploy to make the audio clip go viral Manikrao Shinde allegation Nashik News)

गेल्या २० वर्षांतील श्री. भुजबळ यांच्या राजकारणातील दुसऱ्या पर्वात ओबीसी समाजानेही सर्व काही ओळखले असून, ओबीसी समाजाची फक्त निवडणुकीच्या वेळेसच आठवण येते. हा अनुभव येवल्यातील ओबोसी समाजाला आला आहे.

खरेतर अठरा- पगड जाती-जमाती, बारा बलुतेदारांना घेऊन चालणारा गावागावांतील समाज कोणता आहे, तर तो मराठाच आहे. कधीही येवला मतदारसंघाने जातीवाद अथवा मराठा-ओबीसी भेदभाव केला नाही.

पाच पपंचवीस घरे कानडी समाजाची असतानाही येथील जनतेने डॉ. कानडे यांना, त्याचप्रमाणे हिरूभाऊ गवळी यांचीही दहा-वीस घरे नसतानाही येवल्याचे आमदार केले आहे. जनार्दन पाटील वंजारी असून, दोन वेळेस आमदार झाले. हा येथील मोठ्या मनाचा असलेल्या मराठा समाजचा इतिहास आहे.

येवल्याचा विकास अधिक जोमाने होईल, यासाठी येवल्यातील जनतेने यांना स्वीकारले व डोक्यावर घेतले. मात्र, पाणी, उद्योगधंदे असे ठोस कोणतेच कामे झाले नाही, तर पदरात निराशाच पडली आहे.

मराठा समाज नेहमी सहकार्य करीत असताना, मनोज जरांगे-पाटील यांच्याविषयी काढलेले आक्षेपार्ह उद्गार, तसेच मतदारसंघात मराठा समाजाने केलेला उठाव बघता आता अडचण होईल याची खात्री पटली आहे, म्हणून भुजबळ यांना पुन्हा ओबीसीचा एकमेव नेता होण्याचे स्वप्न पडायला लागले आहे.

राजकीय फायद्यासाठी पुन्हा इतर समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणजेच भुजबळांची व्हायरल झालेली क्लीप व ते मांडत असलेली भूमिका जाणीवपूर्वक असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: कर्णधार सूर्यकुमार यादव भारताकडून खेळणार की नाही? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra Tourists in Uttarakhand Video : मोठी बातमी! उत्तराखंडमधील महासंकटात अडकले महाराष्ट्रातील दहा पर्यटक

Uttarkashi Cloudburst Latest Update : उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार! ५० पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता, १० भारतीय लष्काराच्या जवानांचाही समावेश...

Latest Maharashtra News Updates Live : देश विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Best Employees Morcha: बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा, काय आहेत मागण्या?

SCROLL FOR NEXT