Ganeshotsav 2023  esakal
नाशिक

Ganeshotsav 2023 : पर्यावरणपुरक गणेश उत्सव साजरा करा; प्रदुषण मंडळाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : येणारा गणेशोत्सव हा नाशिककरांनी जल हवा ध्वनी प्रदुषण होणार नाही व पर्यावरणाचे संरक्षण तसेच संवर्धन व्हावे अशा पद्धतीने साजरा करावे असे आवाहन नाशिकचे प्रदुषण नियत्रंण मंडळाचे प्रादेशिक आधिकारी राजेंद्र राजपूत व उप प्रादेशिक आधिकारी अमर दुर्गुळे यांनी केले आहे.

दरम्यान येणाऱ्या गणेशोत्सवाची नाशिकसह देशभरात मोठ्या प्रमाणावर नियोजक करण्यात येत आहे.

गणेशोत्सवात मुर्ती दानची संकल्पना पहिल्यांदाच नाशिक महापालिका व सामाजिक संस्थाच्या माध्यमातून तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपस्थित सुरू केली. (Pollution Board appeals to celebrate Ganesh Utsav eco friendly nashik news)

पुढे ही संकल्पना आज देशात राबवली जात आहे. पण वाढती लोकसंख्या व गणेश उत्सवाची वाढता उत्साह पाहता नाशिककरांनी पर्यावरणाबाबत सजग राहून या चळवळीत अधिक जोमाने व बहुसंख्याने सहभागी होण्याचे आव्हान प्रदुषण नियत्रंण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

पुढे उपप्रादेशिक आधिकारी अमर दुर्गुळे यांनी सांगितले की सणांचे साजरीकरण, विशेषतः सार्वजनिक स्तरावर होणारे सणांचे साजरीकरण हे जनसमुदायात नवचैतन्य देणारे असावे. काही वेळा अशा साजरीकरणातून निसर्गाच्या जल वाहीन्या या प्रमुख घटकांचे प्रदूषण सर्व मानवी समाजासाठी हानीकारक ठरत असते.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वेळोवेळी सणाच्या वेळी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पर्यावरण विषयक विविध कायदे व त्या कायद्यांची अंमलबजावणी व्यापक जनहितार्थ असून त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीमध्ये जिप्सम, गंधक, फॉस्फरस व मॅग्नेशियम अशी रसायने असतात. मूर्ती रंगविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक रंगांमध्ये पारा, कॅडमियम, आर्सेनिक, शिसे आणि कार्बन 'देखील असू शकतात जे की से मज्जासंस्था व मूत्रपिडासाठी घातक असलेले व जेवसंचयी गुणधर्म असलेले जट घालू असतात.

हे घटक माशासारख्या जलचरात समाविष्ट झाल्यावर ते अन्नसाखळीतून अतिमता आपण सेवन करणाऱ्या अन्नात ते आढळून येतात. तसेच मूर्ती सजावट करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, थर्माकोल इ. घटक जेब अविघटनशील असल्यामुळे त्यांचे जलस्रोताव विसर्जन केल्यास स्थलीय जलीय परिसंस्थेस हानिकारक ठरतात.

प्लास्टर ऑफ परीस मूर्ती करण्यात उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्र.१ ध्येयाने साजरीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना निमित करण्याचे निर्देश प्रदुषण मंडळावा दिले होते. त्यानुसार केंद्रीय प्रदुषण नियंत्र सन २०१० मध्ये मूर्ती विराजनासाठी मार्गदर्शक सूचना जारी करून त्यांची अंगलबजावणी सुनिधित या सर्व राज्यांना दिल्या होत्या.

नंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मा. राष्ट्रीय हरित लवाद यानी विविध प्रकरणांमध्ये दिलेल्या आदेशांचे अनुपालन करून तसेच विविध भागधारकाशी करून व जलस्रोतांच्या संरक्षणाचे हित जोपासून २०१० मधील मार्गदर्शक सूचनाअधिकत करून दि. १२ मे २०२० रोजी याबाबत नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सदर सुधारित मार्गदर्शक सूचनेंतर्गत जलप्रदूषणास कारणीभूत ठरू शकणाच्या मुर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या दिनांक १२ से २०२० च २३ जुलै २०२1 रोजीच्या पत्रान्वये सदर सुधारित मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी दिनांक १ जानेवारी २०२१ पासून सर्व राज्यांमध्ये करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दि. १२/०५/२०२2 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पर्यावरणपूरक सण साजरीकरणावादत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण वेळोवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांना कळविण्यात आले आसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नाशिककरांनी या पर्यावरण अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होवून सुदंर नाशिक व स्वच्छ नाशिकची संकल्पना थांबवण्यासाठी मदत करावी असेही आव्हान मंडळातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT