river pollution 
नाशिक

गोदावरी, नंदिनीत प्रदूषण कायम; निवासी व व्यापारी पेठांमध्ये ध्वनिप्रदूषणातही वाढ

विक्रांत मते

नाशिक : कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या साडेतीन महिन्यांचा लॉकडाउन काळ वगळता शहरातील हवा, पाणी व ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे वार्षिक पर्यावरण मापन अहवाल जाहीर करण्यात आला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. वर्दळीच्या ठिकाणी हवेत सल्फरडाय ऑक्साइड प्रमाणापेक्षा अधिक, तर गोदावरी नदीपात्रात तपोवन भागात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण अधिक आढळले आहे. निवासी व व्यापारी पेठांमध्ये ध्वनिप्रदूषणाने पातळी ओलांडली आहे. 

कार्बन मोनाक्सॉइड वाढले 
सीबीएस, पंचवटी कारंजा, द्वारका सर्कल, पाथर्डी फाटा येथे हवेतील पार्टिक्युलेट मॅटर (पीएम १०)चे प्रमाण अधिक आढळले. आयटीआय सिग्नल, द्वारका, बिटको चौकात हवेतील सल्फरडाय ऑक्साइडचे प्रमाण मानांकनापेक्षा अधिक आढळले. नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण नियंत्रणात आढळले. सीबीएस, मुंबई नाका व पाथर्डी फाटा येथे हवेतील कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण चार मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपेक्षा अधिक आढळले आहे. 

जलप्रदूषण कायम 
गंगापूर गाव, गोदा पार्क व तपोवनात पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यातील तपोवन भागात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) १० मिलिग्रॅम प्रतिलिटर या मानकापेक्षा अधिक आढळले. नंदिनी नदीत आयटीआय पूल, सिटी सेंटर मॉल व समाजकल्याण कार्यालयाच्या आवारात पाण्याचे नमुने घेण्यात आले. तेथे सर्वच ठिकाणी मानांकनापेक्षा अधिक बीओडीचे प्रमाण आढळले. वाघाडी नदीवरील म्हसरूळ अमरधाम, जुना हत्ती पूल व गणेशवाडी येथे बीओडीचे प्रमाण अधिक आहे. वालदेवी नदीवरील विहितगाव येथे मानांकनापेक्षा अधिक बीओडी आढळून आला. 

निवासी क्षेत्रात ध्वनिप्रदूषण 
रहिवासी क्षेत्रात सकाळी ५५, तर रात्री ४५ डेसिबल ध्वनी मर्यादा असणे आवश्यक आहे; परंतु पंचवटी कारंजा व द्वारका भागात ध्वनिप्रदूषणाने पातळी ओलांडली आहे. व्यापारीपेठेत सकाळी ६५, तर रात्री ५५ डेसिबल ध्वनी मर्यादा असणे आवश्यक आहे. या भागातही ध्वनीने मर्यादा ओलांडली असून, सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये ७२, तर अंबड औद्योगिक वसाहती क्षेत्रात ७० डेसिबलपेक्षा अधिक ध्वनी मर्यादा ओलांडली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT