pomegranate  esakal
नाशिक

Nashik News: मालेगावच्या फळबाजारात डाळिंबाची आवक वाढली! घाऊक बाजारात 80 ते 110 रुपये किलो डाळिंबाची विक्री

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील फळबाजारात आंब्यापाठोपाठ डाळिंबाचीही आवक वाढली आहे. डाळिंबाची आवक वाढल्याने येथे रोज सहा हजार कॅरेटची विक्री होत आहे. घाऊक बाजारात ८० ते ११० रुपयापर्यंत डाळिंब विकला जात आहे.

८० टक्के माल परराज्यात विक्रीसाठी जात आहे. गेल्या आठवड्यापासून कसमादे परिसरात ऊन सावलीचे वातावरण असल्याने काढणीस आलेल्या डाळिंबावर तेल्या व प्लेग या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. (Pomegranate arrival increased in Malegaon fruit market 80 to 110 rupees per kg of pomegranates in wholesale market Nashik New)

येथील फळ बाजारात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा डाळिंबाला चांगला भाव मिळाला आहे. येथे रोज सुमारे एक टनापेक्षा जास्त डाळिंबाची विक्री होते. येथे घाऊक बाजारात डाळिंबाला ११० रुपयापर्यंत भाव मिळत आहे.

शेतकरी डाळिंबाची विगतवारी करून चार प्रकार करतात. यात नंबर वन असलेल्या डाळिंबाला भाव जास्त मिळतो. कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे पीक घेतले जाते. तेल्या, प्लेग या रोगांचे आक्रमण झाल्याने अनेकांनी डाळिंब बागा उखडून फेकल्या.

मात्र डाळिंब सारखा पैसा देणारे नगदी पीक नाही याची शेतकऱ्यांना वारंवार खात्री झाली आहे. आता हळूहळू शेतकरी पुन्हा डाळिंबाची लागवड करु लागला आहे.

डाळिंब हे सात महिन्यात येणारे पिक आहे. ऑगस्टपासून ते जानेवारीपर्यंत फळबाजारात डाळिंबाची रेलचेल असते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून येथे डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक वाढणार आहे.

आवक वाढली तरी भाव स्थिर राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. शहरातून कानपूर, लखनौ, पंजाब, हरियाना, पटणा, दिल्ली, भोपाळ, मुंबई यासह विविध राज्यांमध्ये व्यापारी डाळिंब विक्रीसाठी पाठवतात. शहरातील पूर्व भागातील बाजारात हलक्या स्वरूपाचा माल विकला जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कसमादे परिसरातील डाळिंबाची चवच न्यारी असल्याने ग्राहक येथील डाळिंबाला पसंती देतात. दोन आठवड्यापूर्वी येथील बाजारात प्रथम दर्जाचा डाळिंब हंगामातील सर्वात उच्चांक ३ हजार २०० ते ३ हजार ५०० दराने कॅरेटची विक्री झाली. सध्या ६ हजार कॅरेट डाळिंब विक्री होत असून ऑगस्टमध्ये डाळिंबाचे सीझन असल्याने येथे रोज १२ हजार कॅरेट डाळिंब येण्याची शक्यता आहे.

"पंधरा दिवसानंतर डाळिंबाची आवक वाढेल. येथील बाजारपेठ विशेष डाळिंबसाठी प्रसिद्ध असल्याने नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात माल येथे येतो. फळ बाजारात सर्वात जास्त मागणी असून भाव चांगला आहे."- विनायक जगताप, मुन्ना फ्रूट कंपनी, मालेगाव

"शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल तयार झाला आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा भाव चांगला मिळत आहे. पंधरा दिवसापासून सतत रिमझिम पाऊस व थंड वातावरणामुळे डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रिमझिम पावसात डाळिंब बागांवर फवारणी करता येत नाही. हातातोंडाशी आलेला घास तेल्या रोगामुळे हिरावला जात असल्याने शेतकरी चिंतेत आहे."

- भारत सूर्यवंशी, डाळिंब उत्पादक मुंगसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT