Chandrashekhar Jangale collecting nails
Chandrashekhar Jangale collecting nails esakal
नाशिक

Positive News : कुणालाही इजा होऊ नये यासाठी मैदानात पडलेले खिळे गोळा करणारा अवलिया!

नरेश हाळणोर

नाशिक : पवननगर येथील मैदानात सध्या एक अवलिया अत्यंत निस्वार्थ वृत्तीने मैदानात पडलेले खिळे, स्क्रू आदी गोळा करण्यात मग्न असल्याचे बघावयास मिळत आहे. एवढेच नव्हे, तर हा अवलिया मैदानातील झाडांचेही पालन-पोषण करतोय. (Positive News chandrashekhar jangale collects nails lying in ground so that no one gets hurt selfless service nashik news)

चंद्रशेखर जंगले असे या अवलियाचे नांव आहे. भुसावळनजीक एका खेडेगावातून ते रोजगारानिमित्त नाशिकला आले अन्‌ येथेच स्थायिक झाले. पुरेसे शिक्षण नसल्याने ते वाहन चालविणे शिकले. कोणाचेही वाहन चालवून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात.

बालपणी गुराखी म्हणून काम करताना त्यांचे निसर्गाशी नाते जोडले गेल्याने कुठेही रिकामी जागा दिसली, की ते रोपटे लावतात अन्‌ त्याची देखभालही करतात. शिवजयंतीला उभारलेले देखावे दोन दिवसांपूर्वीच काढण्यात आले.

मात्र, त्यासाठी वापरलेले खिळे, स्क्रु अनेक ठिकाणी अजूनही विखुरलेले आहेत. पवननगर मैदानात पहाटेपासूनच जॉंगिंग, व्यायाम करण्यासाठी येणाऱ्यांची आणि शेजारीच शाळा असल्याने विद्यार्थ्यांचीही वर्दळ असते.

मैदानात खिळे, स्क्रु पडून असल्याने त्यांना इजा पोचण्याची शक्यता हेरून श्री. जंगले पहाटेच मैदानात येऊन कोणाच्याही मदतीशिवाय हे खिळे, स्क्रु गोळा करण्यात मग्न असतात.

निस्वार्थ काम

पवननगरच्या क्रीडा मैदानावर खिळे पडलेले असल्याचे अनेकांच्या लक्षातही आले नाही. परंतु, जंगले यांनी गुरुवारी (ता. २) पहाटे सहापासूनच आपले निस्वार्थ काम येथे सुरू केले.

एक छोटी बादली घेऊन ते आले आणि खिळे, स्क्रु, तारा गोळा करून त्या बादलीत जमा करू लागले. पाहता-पाहता बादलीही भरून गेली. तेव्हा मात्र मैदानावरील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे कौतूक करीत हातभार लावण्याचा प्रयत्न केला.

झाडांचेही पालनपोषण

चंद्रशेखर जंगले यांना वृक्षारोपणाची भारी आवड. मैदानाभोवती लावलेल्या झाडांचे तेच पालनपोषण करतात. दिवसाआड ते या झाडांना पहाटेच पाणी देतात, तेथील कचरा गोळा करतात. मैदानावरील प्लॅस्टिक गोळा करून कचराकुंडीत टाकतात.

याशिवाय, परिसरात सुरू असलेल्या रस्ता दुभाजकांच्या कामाच्या ठिकाणीही ते आग्रहाने काळी मातीच टाकण्यास सांगतात. जेणेकरून तेथे वृक्षलागवड करता येईल.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

नोकरीही गमावली

शहरात ते एका स्कुलबसवर चालक म्हणून नोकरीला होते. त्या दरम्यान, मुलांना शाळेत घेऊन जात असताना एका वाहनाच्या धडकेत गाय जखमी झालेली त्यांना दिसली. त्यांनी बस थांबवून गाईला रस्त्यातून बाजुला केले.

पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधून गाईवर उपचाराची सोय केली. मात्र, या प्रकारामुळे मुलांना शाळेत पोचण्यास उशिर झाल्याने शाळा प्रशासनाने त्यांना नोकरीवरून काढून टाकले.

"भविष्यात चांगले जगायचे असेल, तर आत्तापासूनच झाडांची निगा राखली पाहिजे. परिसर स्वच्छ राखला पाहिजे. देखावा उभारणाऱ्यांनीच नंतर हे खिळे उचलून मैदान स्वच्छ करणे अपेक्षित होते. या खिळ्यांमुळे माझ्याही पायाला जखम होऊ शकते. तसे होऊ नये, म्हणून शक्य तितके खिळे गोळा करतोय. यासाठी आणखी काही दिवसही लागतील. पण, हरकत नाही, मी करेन." -चंद्रशेखर जंगले, जागरुक पर्यावरणप्रेमी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

SCROLL FOR NEXT