shivaji chumbhale and chhagan bhujbal.png 
नाशिक

शिवसेनेच्या ''या'' नेत्याला भुजबळांशी नडणं पडलं महागात!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : नाशिक बाजार समितीची सभापती, वादग्रस्त शिवसेना नेते शिवाजी चुंभळे यांनी कर्मचाऱ्यांकडून लाच घेतांना अटक झाली. त्यानंतर त्यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव आला. या दरम्यान त्यांनी सहकारी नेत्यांनाच मारहाण केल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या. एवढ्यावर न थांबता आपल्या अधोगतीचे आत्मपरिक्षण करण्याऐवजी त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळांवर आरोप केले. त्यातून त्यांचे सभापती पद गेले. याचे वर्णन आता 'नाशिकच्या राजकारणात सध्या भुजबळांना नडला तो राजकारणात फसला,' असे होत आहे.

बाजार समितीच्या कोट्यावधीच्या निविदांना स्थगिती

नाशिक बाजार समिती राज्यातील आघाडीची आहे. जिल्ह्यात गिरीश महाजनांचा शब्द प्रमाण असतांना शिवसेनेचे श्री. चुंभळे यांनी महाजनांच्या अदृष्य मदतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांची राजकीय कोंडी करीत मोठी पदरमोड करुन सभापतीपद मिळवल्याचे बोलले जाते. मात्र सभापती होण्यासाठी 'खर्ची' झालेल्या परिश्रमाचे चीज होण्याआधीच त्यांच्यामागे अडचणींचा ससेमीरा लागला. बाजार समितीच्या कोट्यावधीच्या निविदांना स्थगिती मिळाली. गाळे लिलाव, दरवाढीला विरोध झाला. त्यातच कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लाच घेताना त्यांना अटक झाली.

यांच्याशी खेटत राहिल्याने चुंभळेंवर हे राजकीय बालंट आले

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले व छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रकरणामुळे सहकार कलम 45-1 अन्वये त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. वादग्रस्त असलेले शिवाजी चुंभळे यांनी त्यावर थेट छगन भुजबळांवरच आरोप केले. अन्‌ राजकीय सूत्रे फिरली अन्‌ ते एकटे पडले. माजी खासदार व बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्या गटाचे, निष्ठावंत संचालक चुंभळेपासून अलगदपणे दूर झाले. यात थेट पालकमंत्री कुठेही नसले तरी भुजबळांची मर्जी खप्पा झाल्याने अन्‌ श्री. पिंगळे यांच्याशी खेटत राहिल्याने चुंभळेंवर हे राजकीय बालंट आले हे लपून राहिलेले नाही.

शिवाजी चुंभळे एकटे पडले

राज्यातील नावाजलेल्या बाजार समितीचे सभापती, शिवसेना नेते शिवाजी चुंभळे एकटे पडले. जिल्हा बॅंकेच्या आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर ही त्यांची मोठी राजकीय पिछेहाट मानली जाते. बुधवारी झालेल्या सभेत कॉंग्रेसचे संपत सकाळे यांची बिनविरोध सभापतीपदी निवड झाली. त्यामुळे सहकारातील महत्त्वाच्या संस्थेत कॉंग्रेसकडून शिवसेनेला जोर का झटका बसला आहे.

श्री. चुंभळे शिवसेनेचे नेते आहेत. बाजार समितीत उपसभापती युवराज कोठुळे, विश्‍वास नागरे, संपत सकाळे, तुकाराम पेखळे, शंकरराव धनवटे, दिलीप थेटे, सौ. माळेकर, रवी भोये, प्रभाकर मुळाणे, विश्‍वास नागरे, संजय तुंगार यांसह दहा संचालकांनी वेगळी चूल मांडली होती. महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष एकत्र आल्याने त्यात शिवसेनेच्या चुंभळेंचे पद गेल्याची राजकीय चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT