ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik News : प्रवीण पाटील यांच्या बदलीस ‘मॅट’कडून स्थगिती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोरदरच त्यांची तडकाफडकी नगरला बदली झाली.

या विरोधात प्रवीण पाटील यांनी शासनाच्या ‘मॅट’कडे धाव घेतली होती. (Postponement of Praveen Patil's transfer from MAT nashik news)

यात ‘मॅट’ने पाटील यांच्या बदलीला स्थगिती दिली असल्याचे वृत्त आहे. मात्र, प्रत्यक्षात बदली स्थगितीचे आदेश प्राप्त झालेले नाही. तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्यावर लाचलुचपत विभागाने कार्यवाही केल्याने हे पद रिक्त होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये या पदावर धुळे येथून प्रवीण पाटील यांची बदली झाली होती.

प्रवीण पाटील सात महिन्यांपूर्वीच ते माध्यमिकला रुजू झाले होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना त्यांची तडकाफडकी बदली झाली. जिल्हा परिषदेच्या सुपर फिफ्टी अभिनव उपक्रम राबविताना पाटील यांना दूर ठेवण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या वेळी प्रशासनाकडून झालेली तक्रार तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी पाटील यांच्या कामकाजाविषयी लेखी तक्रार केल्याने पाटील यांची बदली झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती. या बदलीविरोधात पाटील यांनी शासनाच्या ‘मॅट’कडे दाद मागितली होती. ‘मॅट’मध्ये बुधवारी झालेल्या सुनावणीत या बदलीला दोन दिवसांची स्थगिती देण्यात आली होती.

दोन दिवसांची स्थगिती संपल्यावर त्यावर शुक्रवारी (ता.२१) पुन्हा सुनावणी झाली. यात ‘मॅट’कडून केवळ मंत्र्यांच्या पत्रावर बदली कशी केली, तसेच बदली होऊन केवळ सात महिनेच झालेले असताना बदली कशी केली, अशी विचारणा केल्याचे समजते. त्यावर ‘मॅट’ने निकाल राखून ठेवला होता. पुन्हा सुनावणी प्रक्रिया पार पडली. यात बदलीला स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबतचे अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT