Poultry with five thousand birds belonging to Bhatu Khairnar of Rampura (Malegaon) was destroyed in the storm esakal
नाशिक

Nashik Rain Update : 5 हजार पक्षी असलेला Poultry shed वादळात जमीनदोस्त

दीपक खैरनार -सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मालेगाव तालुक्यातील रामपुरा येथील भटू मोतीराम खैरनार यांचा पाच हजार पक्षांच पोल्ट्री सेड दुपारी साडेबाराच्या सुमारास आलेल्या वादळात जमीनदोस्त झाला.

यामुळे सदर शेतक-याचे अठरा लाखांहून अधिक नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे.

काटवन परिसरातील रामपुरा येथील युवा शेतकरी भटू मोतीराम खैरनार हे (गट क्रमांक ४६) मध्ये कोरडवाहू पाच एकर क्षेत्रात कुक्कुट पालन करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. (Poultry shed for 5000 birds destroyed due to storm Nashik Rain Update news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान याच पोल्ट्रीच्या एका बाजूस कुटुंबासहित वास्तव्य करीत आहेत. रविवार (ता.४) दुपारी साडेबाराच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार आलेल्या वादळात होत्याचे नव्हते केले.

पाच हजार पक्षांचा पोल्ट्री सेड वादळात अलगद उडाल्याने श्री. खैरनार यांचे अतोनात नुकसान झाले. काल शनिवार (ता.३) रोजी नुकतेच पाच हजार पक्षी पोल्ट्रीत टाकले होते.

या कोवळ्या पक्षांचा जीव जातांना श्री. खैरनार कुटुंबियांना अश्रू अनावर झाले आहेत. तसेच संसार उघडय़ावर पडल्याने आता करावे तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून भरपाई द्या अशी मागणी खैरनार कुटुंबातील सदस्यांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Latest Marathi News Live Update : चिंचवडमधील फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT