Shetkari Vikas Panel, cheering after winning the election of the buying and selling team.
Shetkari Vikas Panel, cheering after winning the election of the buying and selling team. esakal
नाशिक

Nashik Election: पिंपळगाव खरेदी-विक्री संघात शेतकरी विकास पॅनलची सत्ता!

सकाळ वृत्तसेवा

Nashik Election : पिंपळगांव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने १५ पैकी ११ जागा जिंकुन लोकमान्य परिवर्तन पॅनलच्या सत्तेचे स्वप्न धुळीस मिळविले. प्रचारादरम्यान चुरशीची वाटणारी ही निवडणुक प्रत्यक्षात अगदीच एकतर्फी झाली.

शेतकरी विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांनी प्रतिस्पर्धी लोकमान्य परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना अवघ्या दोन मतांच्या सरासरीने पराभवाची धुळ चारली.

दरम्यान, सोसायटी गटात मात्र लोकमान्य परिवर्तनच्या तीन उमेदवारांनी दुप्पट मतांच्या फरकाने विजय मिळविला. (power of Farmer Development Panel in Pimpalgaon buying and selling association nashik news)

पिंपळगांव खरेदी-विक्रीसंघासाठी रविवारी (ता. १४) पिंपळगांवच्या प्राथमिक शाळेत मतदान व लगेच मतमोजणी झाली. सुरवातीला सोसायटी गटाच्या मतमोजणीत लोकमान्य परिवर्तनच्या तीन उमेदवारांनी विजयश्री खेचुन आणली.

पण, सर्वसाधारण, ओबीसी, स्त्री राखीव गटात मात्र शेतकरी विकास पॅनलने विजयी घौडदौड सुरू केली. पहिल्या फेरीपासुनच सर्व अकरा उमेदवारांनी दमदार विजयी आघाडी घेतली.

अखेरच्या फेरीत शेतकरी विकासच्या उमेदवारांनी सरासरी अवघ्या दोन मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारांना चारीमुंड्या चित करत सत्ता कायम राखली. लोकमान्य परितर्वनला सोसायटी गट वगळता मतदारांनी सपशेल नाकारले.

परशराम आथरे, संदीप फड, बाळासाहेब मोते यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुक निर्णय अधिकारी श्री. भामरे यांनी निकाल जाहीर करताच शेतकरी विकास पॅनलच्या समर्थकांनी फटाक्याची आतीषबाजी करून जल्लोष केला. दगुनाना मोरे यांच्या पुतळ्यास या वेळी अभिवादन करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

सुरवातीला नेते विरहीत असलेली ही निवडणुक नंतर मात्र दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे प्रतिष्ठेची बनली होती. शेतकरी विकास पॅनलकडुन मविप्रचे उपाध्यक्ष विश्‍वासराव मोरे, पिंपळगांव सोसायटीचे संचालक सतीश मोरे,

माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, रविंद्र मोरे, तर लोकमान्य परिवर्तनकडुन सरपंच भास्करराव बनकर, मविप्रचे माजी संचालक दिलीप मोरे, सोमनाथ मोरे, उद्धव निरगुडे यांनी मोर्चेबांधणी केली.

"काही नेत्यांच्या अट्टाहासामुळे बिनविरोधची परंपरा मोडीत निघुन निवडणुक लादली गेली. मतदारांनी सत्ता परिवर्तनाचे विरोधकांचे मनसुबे उधळुन लावले असुन, शेतकरी विकासला कौल दिला आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ काम करणार आहे."

-विश्‍वासराव मोरे, उपाध्यक्ष, मविप्र

शेतकरी विकासचे विजय उमेदवार (कंसात मिळालेली मते)

* सर्वसाधारण गट : निवृत्ती आथरे (३७९), राजाराम आथरे (४०४), जगन्नाथ महाले (४११), अशोक मोरे (३६६), मनोज मोरे (३९५), संपतराव मोरे (३४५), साहेबराव साठे (३६७), इंदुबाई गवळी (४८६), मनिषा निरगुडे (४४१)

* ओबीसी गट : रमेश शिंदे (४५२), भटक्या जाती-जमाती गट-ज्ञानेश्‍वर जाधव (बिनविरोध)

लोकमान्य परिवर्तन पॅनल

* सोसायटी गट : दौलतराव कडलग (४५), समाधार साठे (४५), दौलत दौंड (४०)

* अनुसुचित जाती-जमाती गट : आशिष बागुल (बिनविरोध)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT