fire of Electric pole  esakal
नाशिक

सारडा सर्कल परिसरात विजेच्या खांबास आग

युनूस शेख

जुने नाशिक : सारडा सर्कल परिसरातील विजेच्या खांबास (Electric pole) गुरुवारी (ता. २३) रात्री सव्वाआठच्या सुमारास अचानक आग लागली. आगीच्या ठिणग्या खाली पडत होत्या. परिसरात एकमेकास लागून अनेक गॅरेज अन्य व्यावसायिकांची दुकाने असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

परिसरातील मोहसीन खान, आबिद खान, मुझफ्फर खान यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वीज वितरण विभागास तसेच अग्निशामक विभागास माहिती दिली. वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील वीजपुरवठा खंडित करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशामक विभागाचे कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले. आग विझल्याने ते माघारी फिरले. वेळीच वीजपुरवठा खंडित केला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती. कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत असल्याने परिसरात बराच वेळ वीजपुरवठा (Power supply cut off) खंडित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT