Pawan Pawar, Avinash Shinde and others discussing with Prakash Ambedkar, the leader of Vanchit Bahujan Aghadi at the government rest house. esakal
नाशिक

Nashik Political News : आंबेडकरांच्या "फ्लाईंग व्हिजिट" ने राजकीय चर्चेला वेग!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अचानक नाशिकला फ्लाइंग व्हिजिट दिल्याने वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांचा हा दौरा नेमका कशासाठी होता, हे मात्र गुलदस्त्यात राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट यांच्यात युती करायची की नाही , यासंदर्भातदेखील या वेळी चर्चा झाली का, त्या दृष्टीनेहीदेखील नाशिक दौऱ्याचे विविध अर्थ काढले जात आहेत. (Prakash Ambedkar visit boosted political discussion Nashik News)

महापालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही २०२४ मध्ये होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने या सर्व निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी पक्षातर्फे जोरदार रणनीती आखण्यात येत आहे.

त्यामुळे आंबेडकर यांच्या नाशिक भेटी वाढल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र रविवारी (ता. ७) शासकीय विश्रामगृहावर दिसले. नाशिक महापालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा मानस पक्षातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगर आणि जिल्ह्यात मजबूत व्हावी तसेच ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची अभेद्य फळी असावी, यासाठी जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

विविध पक्षातील अनेक मान्यवर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या भेटीचा सिलसिला सुरू झाला आहे. दरम्यान, या भेटीत बाळासाहेबांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची चर्चा केली किंवा नाही हे समजू शकलेले नाही. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांना याबाबत छेडले असता, त्यांनीही आपणास काहीच माहीत नसल्याचे सांगितले. एकंदरीतच आंबेडकर यांच्या या अनपेक्षित दौऱ्यामुळे राजकीय वातावरण मात्र चांगले ढवळून निघाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT