Kharif crop esakal
नाशिक

खरीप हंगामाच्या तयारीला वेग

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाचे योग्य वेळेवर आगमन झाल्यामुळे त्याच्या आशा पल्लवित झाल्या असून खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह तालुक्याचा कृषी विभागही सज्ज झाला आहे. भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा ३३ हजार १३० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट असून, चालू हंगामात तालुक्यात ३० हजार २४१ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे.

तालुक्यात १२६ महसूली गावे व वाड्यामधील शेतकरी भात, वरई, नागली, सोयाबीन, खुरसणी, मका व इतर पिके घेतात. खरिपात इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ, सोनम, गरी, हाळी, कोळपी या जातीचे भात पिके घेण्यास प्राधान्य देतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ६०३ हेक्टर असून, यंदाच्या खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य ३३ हजार १३० हेक्टर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी दिली. गेल्या वर्षी २७ हजार ८३१ हेक्टरचे उद्दिष्ट होते.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी, गरी कोळपी, १००८ वाय.एस आर, हळे, पूनम, डी १००, ओम ३, सेंच्युरी, ओम, श्रीराम 125, रूपाली, रूपम, विजय, लावव्या, सुरती, वाडा, कोलम, लक्षमी, खुशबू, सोनम, दप्तरी १००८, वर्षा, राजेंद्र यांसह बासमती आदी प्रमुख भात जाती घेतल्या जातात. मात्र भातशेतीचा वाढता खर्च बघितला, तर ते देखील करणे मुश्किल होत असून, खतांच्या वाढलेल्या किमती, बी- बियाणे, औषधे वापरून शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खतांच्या किमतीत दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढ होत आहे. तर भाताला दरवर्षी भाव आहे तोच राहतो. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून तालुक्यातील विविध गावांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्याक्षिके होणार आहेत. तसेच मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी काही गावांमधील मातीचे नमुनेही घेण्यात आले आहेत. गावपातळीवर मृद आरोग्य पत्रिकेत शिफारसप्रमाणे खत वापरण्यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. गटमार्फत बांधावर खतवाटप करण्यात येणार आहे.

भात, मका क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता

कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा भात व मका क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. वरई म्हणजेच भगरची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने वरई पिकाकडे शेतकऱ्यांना वळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच खतांचा आवश्यक तेथे मागणीप्रमाणे पुरवठा होणार असून, खताचा तुटवडा पडू नये म्हणून जिल्हा स्तरावर बफर स्टॉक करण्यात येत आहे. बियाणे आवश्‍यकतेप्रमाणे उपलब्ध होईल, असे नियोजन आहे.

खरिपाचे नियोजन :

पीक व लागवडीचे उद्दिष्ट क्षेत्र हेक्टरमध्ये :

भात :३० हजार २४१,नागली :१ हजार ९७८,

मका : २३२,भुईमूग :३८६,सोयाबीन : ९३८,खुरासनी : ५१८, मूग :४०८, तूर :८०, उडीद : ६६

''तालुक्यात भात हे प्रमुख पीक आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पादन चांगल्या प्रमाणात व्हावे, या उद्देशाने सूचनांचा अवलंब करण्यात यावा. ग्लोरीसीडीयाचा वापर, ओळींद लागवड करण्यासाठी १५ बाय २५ सेटिंमीटर यूरिया ब्रिकेटचा वापर करून पारंपरिक चतुःसूत्रीचा वापर करण्यात यावा.''

- शीतलकुमार तंवर (तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी तालुका)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT