ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik News : जिल्हा परिषदेचे तयार रस्ते होतात गायब! ZPच्या बांधकामविषयी संशयाचे भूत

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागात दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करून रस्ते तयार केले जातात. मात्र, हे रस्ते गायब होत असल्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसात जिल्हा परिषदेने तयार केलेली तीन रस्ते गायब झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहिर-बोरपाडा रस्ता, मालेगाव तालुक्यातील टोकडी येथील रस्ता चोरीस गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील रस्ता चोरी झाल्याची तक्रार सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी केली आहे.

या तक्रारींवरून अनेक तालुक्यात असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. (Prepared roads of Zilla Parishad disappear Specters of doubt about construction of ZP Nashik News)

माजी सदस्या इंजिनिअर रूपाजंली माळेकर यांनी वरसविहिर-बोरपाडा रस्ता सार्वजनिक बाधकाम विभागाने केलेला असताना जिल्हा परिषदेने तयार करून रस्त्यांचे ३० लाख रूपयांचे बिल काढण्याचा घाट संबंधित ठेकेदारांकडून सुरू असल्याची तक्रार केली होती.

या रस्त्यावरून स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत अनेकदा वादंग झाले. याची चौकशी देखील झाली. मात्र, बांधकाम विभागाकडून दोषींवर कारवाई झाली नाही. अधिका-यांकडूनच ठेकेदाराची पाठराखण होऊ लागली. शेवटपर्यंत या तक्रारीला न्याय मिळाला नाही.

टोकडेतील रस्ता राज्यभर पोहचला

मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात १५ व्या वित्त आयोगातून तयार करण्यात आलेला रस्ता चोरीला गेल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती.

प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट पोलिस स्टेशनला रस्ता चोरीचा तक्रार नोंदविली. प्रशासनाने कार्यकारी अभियंत्यांना भेट देऊन पाहणीचा अहवाल मागविला.

यात रस्ता असल्याचा अहवाल सादर करून, तक्रार दिशाभूल करणारी असल्याचे सांगण्यात आले. आता द्यानद्यान यांनी विभागीय आयुक्त, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागितली आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

आता कुऱ्हेगावची तक्रार

वाडीवऱ्हे : कुऱ्हेगावच्या सरपंच संगीता धोंगडे व पदाधिकारी भाऊसाहेब धोंगडे यांनी आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे पाठपुरावा करून काशीआई मंदिर ते हनुमान मंदिरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी १० लाख रुपये मंजूर करून आणले होते.

जिल्हा परिषदेकडून या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला, मात्र, त्यानंतर सहा महिने उलटूनही रस्त्याचे काम सुरू होत नसल्याचे बघून सरपंच श्रीमती धोंगडे यांनी जिल्हा परिषदेत चौकशी केली.

त्यावेळी रस्ता तयार झाला असून संबंधित ठेकेदारास पाच लाख रुपयांचे देयक दिले असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. रस्त्याचे काम झालेले नसताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ठेकेदाराशी संगनमत करून त्याला देयक दिल्याचे उघडकीस आल्याने संतप्त सरपंचांनी थेट वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

ग्रामविकास मंत्री, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांच्याकडे तक्रार केली. चोरी झालेला रस्ता शोधून न दिल्यास उपोषण करणार असल्याचे सरपंच धोंगडे यांनी सांगितले.

यापूर्वीही झाल्या होत्या तक्रारी

तत्कालीन बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांवर रस्ते प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली होती.

दिंडोरी तालुक्यात अस्तित्वातील रस्त्यांवर रस्ते दाखवून बिले काढली जात असल्याचा त्यांचा आरोप होता. याही प्रकरणाची चौकशी झाली मात्र, हाती काही आले नाही की येऊ दिले नाही हे अधिकारीच जाणोत, हे प्रकरणही चांगलेच गाजले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT