Police and Army jawans paid homage to Hemant Devre by flying in the air.
Police and Army jawans paid homage to Hemant Devre by flying in the air. esakal
नाशिक

Nashik News : हजारोंच्या उपस्थितीत जवान हेमंत देवरे यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारतीय सैन्यदलातील जवान हेमंत यशवंत देवरे (वय ३५) यांना पश्‍चिम बंगालमधील सिलिगुडी येथे निधन झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास हजारोंच्या उपस्थितीत नाशिकच्या स्मशानभूमीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी ‘भारतमाता की जय’, ‘वीर जवान हेमंत देवरे अमर रहे’ आदी घोषणांनी स्मशानभूमीचा परिसर दणाणून गेला होता. पोलिस व लष्कराच्या जवानांनी हवेत फैरी झाडत हेमंत देवरे यांना आदरांजली अर्पण केली. (presence of thousands funeral of Jawan Hemant Deore in state pomp Nashik News)

अंत्ययात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी पारंपारिक आर्मी परेडद्वारे हेमंत देवरे यांना मानवंदना देण्यात आली.

लष्करी जवान हेमंत देवरे यांना पश्‍चिम बंगालमध्ये वीरमरण आल्यावर काल (ता.६) त्यांचे पार्थिव इंदिरानगर परिसरातील नागरेमळा येथे रात्री आणल्यावर कुटुंबियांसह नातलगांचा शोक अनावर झाला.

देवरे कुटुंब मुळचे नेर (जि. धुळे) येथील हे कुटुंब काही वर्षापासून नाशकात स्थायिक झाले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा निघाली. तत्पूर्वी अंत्ययात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी पारंपारिक आर्मी परेडद्वारे हेमंत देवरे यांना मानवंदना देण्यात आली.

साडेदहाच्या सुमारास शहिद देवरे यांचे पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले. तत्पूर्वीच याठिकाणी लष्करी अधिकारी व जवान मोठा संख्येने उपस्थित होते.

चार वर्षाच्या चिमुरड्या वरदने आई, आत्या व लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या आजोबांसह वडीलांच्या स्मृतीचक्र अर्पण करताना उपस्थितांचे डोळे पाणावले.

स्मशानभूमीत हेमंत देवरे यांच्या चार वर्षाच्या चिमुरड्या वरदने आई, आत्या व लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या आजोबांसह वडीलांच्या स्मृतीचक्र अर्पण करताना उपस्थितांचे डोळे पाणावले.

‘भारत माता की जय’,‘शहिद हेमंत देवरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी लष्करी अधिकारी जवान यांच्यासह पोलिस दलातील कर्मचारी, तहसीलदार शोभा पुजारी, नगरसेविका पुष्पा आव्हाड, लेफ्ट. ओमकार कानडे, एसीपी शेखर देशमुख,आप्तस्वकिय, मित्रमंडळी असे हजारो नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT