NMC Nashik
NMC Nashik esakal
नाशिक

Amrit Mahotsav : टी-शर्ट, टोपी, बॅज खरेदीसाठीही महापालिका कर्मचाऱ्यांवर दबाव

विक्रांत मते

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत महापालिकेतर्फे खरेदी करण्यात आलेले तिरंगी ध्वज व त्यानंतर कर्मचाऱ्यांना टी-शर्ट, टोपी व तिरंगा ध्वज असलेला बॅज खरेदीची करण्यात आलेली सक्ती वादात सापडली आहे. (Pressure on NMC employees to buy Amrit Mahotsav 2022 tshirts caps badges Nashik Latest Marathi News)

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत महापालिकेला दोन लाख तिरंगा ध्वजवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महापालिकेला प्राप्त झालेले तिरंगा ध्वज विक्री करण्यासाठी मुख्यालयास सहा विभागीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती.

प्राप्त झालेले तिरंगी ध्वज सदोष असल्याने सव्वा लाख ध्वज परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ७५ हजार ध्वज विक्रीसाठी उपलब्ध होते; परंतु वाढती मागणी लक्षात घेता ते कमी पडू नयेत, म्हणून खासगी संस्थेकडून एक लाख ध्वज तसेच टी-शर्ट, टोपी व बॅज खरेदी करण्यासाठी ३६ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला;

परंतु लेखा विभागाने थेट नकार देत निविदा काढण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यानंतरही अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने २५ हजार ध्वज संबंधित संस्थेकडून खरेदी केले व खरेदी केलेले ध्वज ठेकेदार व सामाजिक संस्थांना सामाजिक दायित्वांतर्गत खरेदी करण्यासाठी दबाव आणल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी दबाव असताना दुसरीकडे आझादी का अमृतमहोत्सव लोगो असलेले टी-शर्ट, टोपी व बॅज खरेदी करण्यासाठीदेखील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे बोलले जात आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकांमार्फत साडेचारशे रुपयांना टी-शर्ट व टोपीची विक्री करण्यात आल्याने महापालिकेने साजरा केलेला आझादी का अमृतमहोत्सव वादात सापडला आहे.

६३ हजार ध्वज विक्री

दोन लाख ध्वजांपैकी सव्वा लाख ध्वज परत करण्यात आल्यानंतर उर्वरित ७५ हजारांपैकी ६३ हजार ८४० ध्वज विक्री झाले आहेत. यातून महापालिकेला १३ लाख ७५ हजार ३४४ रुपये महसूल प्राप्त झाला.

सर्वाधिक ध्वज सिडको विभागात नागरिकांनी खरेदी केले. सिडको विभागात १५ हजार ३००, पंचवटी विभागात ११ हजार ५११, पूर्व विभागात १३ हजार ६१३, नाशिक रोड विभागात सात हजार १५४, सातपूर विभागात सहा हजार ५८४, तर पश्चिम विभागात नऊ हजार ६४५ ध्वज विक्री झाले. सध्या महापालिकेकडे ११ हजार ८४० ध्वज शिल्लक आहेत.

"एक लाख ध्वजांसह टी-शर्ट, टोपी व बॅज खरेदी करण्याचा प्रस्ताव लेखा विभागाकडे महापालिका आयुक्तांच्या परवानगीने सादर करण्यात आला होता; परंतु लेखा विभागाने खरेदीला नकार देत निविदा काढण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सामाजिक दायित्वाच्या निधीतून ध्वजवाटप करण्यात आले." -सुरेश खाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT