Narendra Modi  esakal
नाशिक

PM Modi In Nashik : थेट गावागावांपर्यंत पोचणार पंतप्रधान मोदी यांचे भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १२) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‍घाटन होत असून, त्या वेळी पंतप्रधान मोदी युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

PM Modi In Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १२) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‍घाटन होत असून, त्या वेळी पंतप्रधान मोदी युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे भाषण हे विकसित भारत संकल्प यात्रा रथाच्या माध्यमातून थेट गावागावांपर्यंत प्रक्षेपण केले जाणार आहे. ११ तालुक्यांमधील १४ गावांमध्ये याचे प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. (Prime Minister Modi speech will reach village nashik news)

याबाबत, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी गुरुवारी (ता. ११) सर्व गटविकास अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेत प्रक्षेपण करण्याबाबत सूचना केल्या. विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये फिरत आहे.

या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोचविल्या जात आहेत. गत दीड महिन्यांपासून ही यात्रा प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायती, तसेच ग्रामपंचायतीअंतर्गत गावांमध्ये जात आहे.

यातच, पंतप्रधान मोदी शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. त्या वेळी पंतप्रधान मोदी तरुणाईला संबोधित करणार आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेतील रथावरून यांचे थेट प्रक्षेपण गावपातळीवर करण्याचे निर्देश आहेत.

या निर्देशानुसार पिंपळगाव धूम (दिंडोरी), तळवाडे भा., कोटबेल (बागलाण), खडकेद (इगतपुरी), बेरवळ (त्र्यंबकेश्वर), कापूर्णे (पेठ), पाथरे बु. (सिन्नर), निमगव्हाण (चांदवड), माणिकपुंज (नांदगाव), कातरणी (येवला), ब्राह्मणगाव वनस, विंचूर (निफाड), गुगूळवाड, वनपाट (मालेगाव) येथे हे प्रक्षेपण केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT