private travel fair rto surveillance if charge extra fare licence seized latur sakal
नाशिक

Nashik News: दिवाळीच्या तोंडावर खासगी वाहनांकडून प्रवाशांची आर्थिक लूट; अवाच्या सव्वा भाडे आकारणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिवाळी तोंडावर आल्याने बाजारात खरेदीची झुंबड उडाली आहे. तसे बाहेरगावी घराकडे जाण्याचे चाकरमणी आणि माहेरवाशिनींना वेध लागले आहेत. मुलांना शाळेला सुट्या लागल्यापासून प्रवासासाठी निघालेल्यांची गर्दी वाढली. नेमका याच गर्दीचा गैरफायदा घेत काही खासगी वाहनधारकांनी आर्थिक लूट सुरू केल्याच्या तक्रारी आहेत.

एरवीपेक्षा अवाच्या सव्वा दरात भाडे आकारणी होत असल्याने ग्राहकांची आणि सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत.

पुणे- मुंबईसह बाहेर राज्यात तसेच अगदी अहमदनगर, सोलापूरसह राज्यातील शहरात जाण्यासाठी नियमित दरापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. (private bus charging more than regular fare from passenger nashik news)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांसाठी ५० टक्के सवलतीत भाडे आकारणी सुरू केल्यापासून ‘एसटी’ला प्रचंड गर्दी आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या गर्दीत लहान मुलांसह दूरचा प्रवास करणाऱ्या महिलांसाठी प्रवास करण्यासाठी जागा मिळविणे अतिशय जिकिरीचे झाले आहे. त्यातच ‘एसटी’च्या निम्म्या भाड्याच्या तुलनेत सध्याचे खासगी वाहनधारकांचे अव्वाच्या सव्वा भाडे म्हणजे दोन बाजूंच्या प्रवासापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

अहमदनगर हे राज्यातील मध्यवर्ती शहर असले, तरी तेथे जाण्यासाठी सकाळपासून नागरिकांना बसस्थानकावर प्रतीक्षा करावी लागते. पुणे प्रवासासाठी प्रवाशांची संख्या इतकी जास्त आहे, की त्यामुळे गाड्या असूनही जागा मिळविणे अवघड असते. अशातच नाशिकमधील अनेक युवक-युवती पुण्यात नोकरी-व्यवसायासाठी असल्याने त्यांचा नाशिकला घरी परतीला येण्याची गर्दी याच काळात वाढली आहे, हेही कारण आहे.

नाशिक-मुंबईदरम्यान रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे पंचवटी, सेवाग्राम राज्यराणीसह स्थानिक चाकरमान्यांना सोयीच्या वाटणाऱ्या रेल्वेगाड्या दिवाळीतील सुट्यांच्या प्रवाशांच्या गर्दीमुळे खचून वाहत आहेत. नियमित रेल्वेगाड्यांशिवाय खास दिवाळीसाठी सुट्या स्पेशल रेल्वेगाड्यांचे चित्र वेगळे नाही. रेल्वेचे आरक्षण दूर पल्ल्यासाठी योग्य ठरते. त्यामुळे दूर पल्ल्याच्या प्रवासासाठी परप्रांतीयांच्या कुटुंबाची धावाधाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

एकूणच सध्या पारंपरिक एसटी आणि रेल्वे या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुऱ्या पडू लागल्याने खासगी वाहनांकडे कल वाढला आहे. त्यातूनच प्रवाशांकडून जागा भाडे आकारणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, प्रादेशिक परिवहन विभागाने मात्र याविषयी तक्रारीचे आवाहन केले आहे; पण दिवाळीच्या सण-उत्सवातील प्रवास आणि आनंदोत्सव सोडून तक्रारी करण्याला प्रतिसाद दिला जात नसल्याने खासगी वाहनधारकांचे मात्र चांगलेच फावले आहे.

येथे तक्रार नोंदवा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विविध संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेत शासनाने भाडे आकारणीबाबत २७ एप्रिल २०१८ ला शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या-त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार निर्धारित दरापेक्षा अधिक दराने भाडे आकारणी केल्यास किंवा प्रवास करताना येणाऱ्या अडचणींची तक्रार प्रवाशांनी ०२५३- २२२००५ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा rto.15-mh@gov.in या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT