Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: सिन्नर तहसील मधील खाजगी संगणक चालक ACBच्या जाळ्यात! रेशन सुरू करून देण्यासाठी स्विकारली लाच

सिन्नर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या खाजगी संगणक चालकास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या खाजगी संगणक चालकास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

तक्रार दाराकडून रेशन सुरू करून देण्याच्या बदल्यात त्याने ही रक्कम स्वीकारली. (Private computer driver in Sinner Tehsil caught by ACB 1 thousand Bribe accepted to start ration Nashik Crime)

शरद रुंजा आढाव (वय 40 ) हा सिन्नर तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत खाजगी संगणक चालक म्हणून काम करतो. तक्रारदाराने पुरवठा विभागात त्याचे शिधापत्रिकेवर रेशन सुरू व्हावे म्हणून अर्ज दिला होता.

त्या अर्जाच्या अनुषंगाने रेशन सुरू करून देण्याच्या मोबदल्यात आढाव याने एक हजार रुपये ची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिन्नर तहसील कार्यालयात सापळा रचला होता. पंचांच्या समक्ष तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना आढाव यास रंगेहात पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT