raddhakrushna gamme.jpg 
नाशिक

''कोरोनाला तोंड देण्यासाठी खासगी डॉक्‍टरांनी पुढे यावे''- राधाकृष्ण गमे

सकाळवृत्तसेवा

नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या असल्या तरी नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टरांनी पुढे यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. 

रुग्णालयात भरती करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्याचे आवाहन

महापालिका मुख्यालयात शहरातील खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुग्णालयांच्या डॉक्‍टरांची बैठक शुक्रवारी झाली. या वेळी कोरोनासंदर्भातील खासगी क्षेत्राच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या वेळी बोलताना आयुक्त गमे म्हणाले, की कोरोनापासून नाशिक मुक्त कसे राहील यासाठी खासगी यंत्रणेने महापालिकेला सहकार्य करावे, शहरातील खासगी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्‍टरांनी कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने शासन निर्देशानुसार उपाययोजना करावी. कोरोना संशयितांना खासगी रुग्णालयात भरती करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्याचे आवाहन केले. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिकमधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे; परंतु रुग्णांची वाढ झाल्यास खासगी यंत्रणाही सज्ज असली पाहिजे. 

शहर कोरोनामुक्त होण्यासाठी सहकार्य करा

संशयित रुग्णाच्या तपासण्या करून योग्य ते उपचार करून शहर कोरोनामुक्त होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, डॉ. कल्पना कुटे, डॉ. प्रशांत शेटे, डॉ. आवेश पलोड, अशोका मेडिकव्हरचे डॉ. सागर पालवे, मॅग्नम हॉस्पिटलचे डॉ. मनोज चोपडा, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. संजय चावला, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटच्या डॉ. शिवानी साबळे, अपोलो हॉस्पिटलचे डॉ. हरी मेनन, सुयश हॉस्पिटलचे हेमंत ओस्तवाल आदी उपस्थित होते. 

रोटरीतर्फे वैद्यकीय साहित्य 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार रोटरी क्‍लब ऑफ नाशिकतर्फे पीपीए किट 15, एन-95 मास्क 40 नग, हॅंडग्लोव्हज दोन हजार 400 नग व फेसशील्ड 50 नग महापालिकेच्या रुग्णालयांसाठी महापालिका आयुक्त गमे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. रोटरीचे अध्यक्ष मनीष चिंधडे, डॉ. राजेंद्र नेहते, विजय दिनानी, सतीश मोरे आदी उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT