private travels business
private travels business Google
नाशिक

खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायाला पुन्हा उभारी; प्रवासी संख्या ७० टक्के पूर्वपदावर

तुषार महाले

नाशिक : कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय (private travels business) इतर व्यवसायांप्रमाणे पूर्णपणे ठप्प झाला होता. जूनमध्ये राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर ट्रॅव्हल्स व्यवसाय पुन्हा उभारी घेत असल्याचे दिसत असून प्रवासी संख्या ७० टक्के पूर्वपदावर आली आहे.

नाशिकमधून बाहेर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, तसेच नाशिकमध्ये परराज्यासह महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. गत दीड वर्षात काही कालावधी सोडल्यास नाशिकमधील धार्मिकस्थळे बंद असल्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर विवाह समारंभावर बंदी असल्यामुळे ट्रॅव्हल्सची बुकिंग बंद आहे, याचाही ट्रॅव्हल्स व्यवसायाला फटका बसला आहे. रोजची प्रवासी संख्या ७० टक्क्यापर्यंत पूर्वपदावर आली असली तरी नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर वाढविला आहे. इतर राज्यात असलेल्या नियमांमुळे प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचे स्टेज ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार परवानगी प्रवाशांना परवानगी देण्यात येत होती. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांसह प्रवाशांना इतर जिल्ह्यात प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागला होता. खासगी ट्रॅव्हल्स प्रवासी संख्या येणाऱ्या सणासुदीच्या काळापर्यंत पूर्ण क्षमेतेने सुरू होईल, अशी आशा ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना आहे.

राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात कोरोना नियमांचे स्टेज असल्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांसह प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र, आता रोजची प्रवासी संख्या पूर्वपदावर येत असली तरी पर्यटनस्थळ, मंदिरे, विवाह समारंभावर निर्बंध असल्यामुळे थोडा फटका बसत आहे.

- योगेश दुसाने, उपाध्यक्ष, प्रवासी वाहतूकदार संघटना

-नाशिकहून बेळगावपर्यंत प्रवासी ट्रॅव्हल्स जातात, परंतु ती सेवा बंद आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, नागपूर सेवा सुरू आहे. रोजची खासगी ट्रॅव्हल्सची प्रवासी संख्या ७० टक्क्यांपर्यंत परत आली असलेतरी पूर्ण क्षमेतेने ट्रॅव्हल्स सुरू होण्यास अवधी लागेल. गुजरातमध्ये प्रवाशांना ई-पाससह आरटी- पीसीआर चाचणी आवश्‍यक आहे.

-एजाज शेख, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्या नाराजीवर तटकरेंचे ‘ऑल इज वेल’; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी घेतली भुजबळांची भेट

Nupur Shikhare- Ira Khan : नुपूर शिखरेच्या आईचा बॉसी अंदाज; नवऱ्याची अवस्था पाहून आमिरची लेक म्हणाली...

SRH vs GT: सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारन अन् विलियम्सनचं रियुनियन, सनरायझर्स हैदराबादन शेअर केला खास Video

VIDEO: पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत भर कार्यक्रमात गैरवर्तन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "दहा हजारपेक्षा जास्त लोकांचा जमाव..."

Latest Marathi News Live Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT