Traffic jam at Bitco Chowk. In the second photo, a crowd of rickshaws and private vehicles at the bus stand. esaka
नाशिक

Nashik Road Traffic : वाहतुकीचा प्रश्न ठरतोय डोकेदुखी; पोलिसांचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिक रोड येथे सध्या वाहतुकीचा प्रश्‍न मोठी डोकेदुखी ठरतो आहे. सार्वजनिक चौकात वाहनांच्या पार्किंगने संपूर्ण रस्ता व्यापून जात आहे. त्यामुळे नाशिक रोडला रोजच वाहतूक कोंडी होत असते. याकडे वाहतूक शाखेचेही दुर्लक्ष होत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने मुख्य ठिकाणांवर पेट्रोलिंग करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. (problem of Nashik Road Traffic is becoming headache Ignorance of police nashik news)

सैलानी बाबा, जेलरोड , शिवाजीनगर, नाशिक रोड, बिटको पॉइंट, दत्तमंदिर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, जुने कोर्ट, मुक्तिधाम, गायकवाड मळा, सोमानी गार्डन, बिटको महाविद्यालय, पासपोर्ट ऑफिसजवळ, देवी चौक या ठिकाणी नागरिक नो- पार्किंगमध्ये वाहने लावून जात असल्यामुळे नाशिक रोडला रोजच वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याकडे वाहतूक शाखा लक्षच देत नसून, याचा परिणाम नाशिक- पुणे रोडवर रोज वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना व वाहनधारकांना करावा लागत आहे.

उड्डाणपुलाच्या आसपासचा परिसरात नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लावून जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीला येथील व्यापारी आणि दुकानदार वैतागलेले आहेत. सध्या नागरिकांना ट्रॅफिक जामचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागत आहे. यामुळे रोज लहान- मोठे अपघात घडत आहे. राजेंद्र कॉलनी, अण्णा हजारे मार्ग या ठिकाणी भाजीवाल्यांनी रस्ता व्यापून टाकल्यामुळे लोक रस्त्यावर गाड्या लावून जातात. पर्यायाने मुख्य राज्य महामार्ग वाहतुकीच्या कोंडीने व्यापत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नाशिक रोडला वाहतूक पोलिसही तसदी घेत नाही. म्हणून शाश्वत उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

"रस्त्यावर वाहने लावण्यानेच वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. यासाठी दत्तमंदिर, बिटको, नाशिक रोडच्या मुख्य रस्त्यांवर नो- पार्किंग झोन उभारायला हवेत. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होईल. शिवाय वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्त्यावरच्या उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाई करायला पाहिजे." - प्रमोद साखरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

Credit Card : ₹3,000 पर्यंत कॅशबॅक; झिरो जॉइनिंग फी; UPI पेमेंट्सवरही फायदा! जाणून घ्या या नव्या क्रेडिट कार्डच्या खास ऑफर्स

Shani Dosha: शनि दोष कमी होईल; फक्त हनुमान मंदिरात गेल्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा!

SCROLL FOR NEXT