admission  sakal
नाशिक

Vocational Courses Admission : विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला या तारखेपासुन सुरुवात

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

Vocational Courses Admission : बहुतांश सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. हे निकाल विद्यार्थ्यांना संकेतस्‍थळावर त्‍यांचा अर्ज क्रमांक व जन्‍मतारीख दाखल करून प्राप्त करता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्‍यक्ष प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा लागून होती. ही प्रतीक्षा आता संपली असून, सीईटी सेलकडून कॅप राउंडच्‍या नोंदणीचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले आहे. ( process of cap round starts from 15 june nashik news)

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली होती. कोरोना महामारीत विस्कळित झालेल्‍या वेळापत्रकानंतर यंदा प्रथमच वेळापत्रकानुसार सीईटी परीक्षा पार पडल्‍या होत्‍या.

त्‍यामुळे पुढील प्रवेश प्रक्रियादेखील वेळेतच पूर्ण होऊ शकणार आहे. दरम्‍यान मार्चपासून सीईटी परीक्षांना सुरवात झाली होती. तर नुकतीच काल (ता.११) बी.एस्सी (नर्सिंग) या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पार पडली.

विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रत्‍यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरवात होते आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता कॅप राउंड प्रक्रिया येत्‍या गुरुवार (ता.१५) पासून सुरु होणार आहे.

यामध्ये टप्‍याटप्‍याने प्रवेश फेर्यांसाठी अभ्यासक्रमनिहाय नोंदणी प्रक्रिया सुरु होईल. पहिल्‍या टप्यांत नऊ अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीला सुरवात होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ऑनलाइन नोंदणी सुरु होण्याचे टप्पे असे-

- १५ जूनपासून- एमबीए/एमएमएस, एमसीए, एलएलबी (पाच वर्षे), बीए/बी.एस्सी.बी.एड.(इंटिग्रेटेड ४ वर्षे), बी.एड.-एम.एड.,बी.एस्सी (कृषी), अभियांत्रिकी (बीई./बी.टेक), औषधनिर्माणशास्‍त्र (बी.फार्मसी), एम. फार्मसी.

- १६ जूनपासून- हॉटेल मॅनेजमेंट (बी.एमएचसीटी), बी.प्‍लॅनिंग, बी.एड ॲण्ड ईएलसीटी, एम.एड., बी. डिझाईन, पदव्‍युत्तर अभियांत्रिकी (एमई/एम.टेक.).

- १८ जूनपासून- एलएलबी (तीन वर्षे), एम.पी.एड., बी.पी.एड., एम.आर्क., एम.एचएमसीटी.

- २० जूनपासून- बॅचरल ऑफ फाईन आर्ट, एम.प्‍लॅनिंग.,

- २६ जूनपासून- बी.एस्सी (नर्सिंग).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT