Thorat Auditorium: Rural Development Minister Girish Mahajan speaking at the Traders Dialogue Conference organized by Bharatiya Janata Party, Traders Cell Nashik Mahajan on Sunday. esakal
नाशिक

Business Dialogue Conference : APNCमुळे व्यावसायिकांना मोठा मनस्ताप; व्यापारी-व्यावसायिकांची भावना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अन्नसुरक्षा कायद्याचा व्यावसायिकांना मोठा त्रास असून, त्यात बदल करण्यात यावा, तसेच एपीएनसी कायद्यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तो सुटसुटीत करण्याची मागणी आज भाजपतर्फे झालेल्या व्यापारी संवाद संमेलनात विविध व्यापारी-व्यावसायिकांनी केली.

त्यावर हे सर्व प्रश्न लवकरच सोडविले जातील, असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. (Professionals suffer Problems due to APNC announcement by BJP at trade union meeting in Nashik Nashik News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात देशाचा सर्वांगीण विकास झाला आहे. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने व अनेक क्रांतिकारी निर्णयांनी शेतकरी, सामान्य माणूस, उद्योजक, विद्यार्थीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. आज जगात आपण अनेक क्षेत्रांत स्वयंपूर्ण झालो आहोत, असेही श्री. महाजन म्हणाले.

केंद्रातील सरकारची कामे, योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी राज्यभरात भाजपतर्फे जनसंपर्क अभियान सुरू आहे, त्याअंतर्गत आज सकाळी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात भाजप महानगर व्यापारी आघाडीतर्फे व्यापारी संवाद संमेलन झाले, त्याप्रसंगी श्री. महाजन बोलत होते.

आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, भाजप नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी महापौर सतीश कुलकर्णी, व्यापारी आघाडीचे शशिकांत शेट्टी, प्रफुल्ल संचेती, प्रदीप पेशकार, कुणाल वाघ आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी केंद्रातील सत्तेतील नऊ वर्षांच्या काळातील विविध योजनांची माहिती देतानाच जनसंपर्क अभियानामागील भूमिका विशद केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रफुल्ल संचेती यांनी व्यापारी हा कणा असल्याचे सांगतानाच मोदी सरकारने याक्षेत्रात भरीव काम केल्याचे सांगितले. अन्नसुरक्षा कायद्याचा व्यावसायिकांना मोठा त्रास असून, त्यात बदल करण्याची मागणी त्यांनी केली.

एपीएनसी कायद्यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तो सुटसुटीत करण्याची निकडही त्यांनी व्यक्त केली. भाजप नेते लक्ष्मण सावजी यांनी केंद्राच्या लोकोपयोगी योजनांचा आढावा घेतला. आमदार फरांदे यांनी भाजप व्यापाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले.

टॅक्सच्या माध्यमातून लूट

व्यावसायिकांनी प्रोफेशनल टॅक्सच्या माध्यमातून सुरू असलेली व्यापाऱ्याची लूट, केमिस्ट बांधव, महापालिकेचे गाळेधारक व्यावसायिक, बी-बियाणे व खत विक्रेते, किरकोळ व घाऊक धान्य व्यापारीवर्गाचे विविध प्रश्‍न मंत्री महाजन यांच्यासमोर मांडत न्यायाची अपेक्षा केली. त्यावर यासर्व प्रश्‍नांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय

श्री. महाजन यांनी केंद्राच्या कामगिरीबाबत बोलताना गत नऊ वर्षांत देशातील वैद्यकीय क्षेत्रातही मोठी क्रांती झाल्याचे सांगितले. आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT