ज्‍येष्ठ अभिनेते मोहन आगाशे : पुनःश्च हनिमून नाटकानिमित्त गप्पांचा कार्यक्रम esakal
नाशिक

बिनशर्त स्‍वीकार्हता नसल्‍याने नात्‍यात कटुता : डॉ. मोहन आगाशे

अरुण मलानी

नाशिक : पूर्वी विवाह झाल्‍यावर वधूला संपूर्ण कुटुंबाशी निभवावे लागायचे. परंतु, अलीकडे नवरा -बायको यांच्‍यातील नात्‍यातील पोकळी वाढत चालली आहे. बिनशर्त स्‍वीकार्हता राहिली नसल्‍याने नात्‍यातील कटुता वाढते आहे, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ अभिनेते आणि मनोविकारतज्‍ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी शुक्रवारी (ता.१) केले.

मु. श. औरंगाबादकर सभागृह इंडियन सायकॅट्रिक सोसायटी नाशिक शाखा, खानदेश मराठा मंडळ यांच्‍यातर्फे पुनःश्च हनिमून नाटकानिमित्त गप्पांच्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ज्‍येष्ठ मनोविकारतज्‍ज्ञ डॉ. शिरीष सुळे, मनोविकारतज्‍ज्ञ डॉ. उमेश नागापूरकर, अभिनेते संदेश कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष आदी उपस्‍थित होते. डॉ. आगाशे म्‍हणाले, की नात्‍यात संवाद होणे, भावना व्‍यक्‍त होणे महत्त्वाचे असते.

अन्‍यथा नाते नष्ट होण्यास सुरवात होते. नाटकाविषयी ते म्‍हणाले, की नाटकातील कुठलातरी भाग हा आपल्‍या आयुष्याशी निगडित असल्‍याचे प्रत्‍येक प्रेक्षकाला आवर्जून वाटते. डॉ. सुळे म्‍हणाले, की प्रत्‍येकाला आयुष्यात, नात्‍यात तडजोड करायला लागते. परंतु कालांतराने नात्‍यात तणाव वाढल्‍यास विसंवाद वाढायला लागतो. आधी प्रियकर- प्रेयसीसाठी काहीपण करण्याची भावना कालांतराने स्‍वतःपुरता विचारात रुपांतरीत होते. हे टाळण्यासाठी संवाद सुरळीत असणे महत्त्वाचे आहे.

डॉ. नागापुरकर म्‍हणाले, की सध्या फारकतींचे प्रमाण वाढलेले आहे. विसंवाद वाढल्‍यास छोट्या कारणांनीदेखील वाद होतात. विश्‍वास कमी होण्यास सुरवात होते, तेव्‍हा चुका दिसायला लागतात. सुदृढ नात्‍यासाठी संवाद व विश्‍वास महत्त्वाचे आहेत. श्री. कुलकर्णी म्‍हणाले, की अवती-भोवतीच्‍या नात्‍यांमधील ताण, अर्थहीनता बघत असताना नाटकातील कथा सुचली. अशात दांपत्‍यांच्‍या आयुष्यासाठी दिशा दाखविण्याचा प्रयत्‍न नाटकातून केला आहे. कार्यक्रमाचे निवेदन मनोविकारतज्‍ज्ञ डॉ. ऋचा सुळे-खोत यांनी केले.

वेळेअभावी नातेसंबंधात दुरावा

बहुतांश नात्‍यात सुरवातीचे आनंदी चार-आठ दिवस सरल्‍यानंतर नाते टिकविण्यासाठी संघर्ष सुरू होतात. जोडीदाराप्रति पाहिलेले स्‍वप्‍न पूर्ण होऊ न लागल्‍याने त्रास वाटायला लागतो. नवरा- बायकोसह अन्‍य सर्वच नात्‍यांमध्ये आज वेळ दिला जात नसल्‍याचे निरीक्षण अमृता सुभाष यांनी नोंदविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

Balbharati : बालभारतीकडून गणितातील चुका मान्य; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; दुरुस्तीची ग्वाही

SCROLL FOR NEXT