Road construction esakal
नाशिक

Nashik News : पेठ रोडच्या दुरवस्थेचे घोंगडे Smart Cityच्या खांद्यावर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक (जि. नाशिक) : गुजरातकडून नाशिककडे येताना महापालिका हद्दीतील पेठ रोडच्या दुरवस्थेवरून नागरिक आता थेट अंगावर जाण्याची भाषा बोलू लागल्याने बांधकाम विभागाने घाईघाईने ठराव करत स्मार्टसिटी कंपनीकडे रस्ता तयार करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. महापालिका हद्दीत हॉटेल राऊ ते तवली फाटा दरम्यान हा जवळपास चार किलोमीटरचा पेठ रस्ता सध्या दुरवस्थेमुळे गाजत आहे. (proposal from construction department in view of growing anger over state of Peth Road on shoulders of Smart City Nashik Latest Marathi News)

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

रस्त्याच्या दुरावस्थेवरून स्थानिक भाजपच्या नगरसेवकांमध्ये जुंपलेली आहे, तर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जाण्याची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण वादग्रस्त होऊन तो वाढण्याचीच अधिक शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी (ता. २२) स्मार्टसिटी कंपनीकडे प्रस्ताव सादर केला. दुरवस्था झालेला रस्ता तयार करण्यासाठी 71 कोटी रुपयांचा निधी गरजेचा आहे.

मात्र, महापालिकेकडे निधी नसल्याने स्मार्टसिटी कंपनीच्या शिल्लक निधीतून रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार स्मार्टसिटी कंपनीने उपलब्ध निधी व व्यवहार्यता तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या शिफारशीवरून महापालिका आयुक्तांनी ९ नोव्हेंबरला झालेल्या महासभेत सदरचा प्रस्ताव मंजूर केला होता. या रस्त्यांवरून वाढते राजकारण लक्षात घेता मंगळवारी स्मार्टसिटीकडे ठरावाची प्रत सादर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara ST demand: मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकून दाखवावी, हरीभाऊ राठोडांचा इशारा! ST मध्ये समाविष्ट करण्याची मागणी

Latest Marathi News Updates : ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार, तारीखही समोर आली!

Vice President Oath 2025 : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती बनले सीपी राधाकृष्णन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

Solapur Rain Update:'सोलापूरला पाण्याचा वेढा; १५० नगरांमध्ये पाणीच पाणी', घरांना नाल्याचे स्वरूप; आयुक्त, आमदारांकडून पाहणी

PM Kisan Yojana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये येणार; नाव यादीत आहे का, कसं तपासाल?

SCROLL FOR NEXT