Dinkar Patil, former House Leader of Municipal Corporation while giving a statement to Guardian Minister Dada Bhuse regarding the problems in Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik News: नाशिक लोकसभा मतदारसंघातील गावांमध्ये सुविधा द्या : दिनकर पाटील

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर तसेच नाशिक तालुक्यांतील गावांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने त्या अनुषंगाने तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली.

पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते जीवा महाला जयंती शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला, या वेळी श्री. पाटील यांनी निवेदन दिले. (Provide facilities in villages of Nashik Lok Sabha Constituency Dinkar Patil Nashik News)

नाशिक लोकसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर-इगतपुरी व सिन्नर या दोन विधानसभा मतदारसंघांतील तसेच नाशिक तालुक्याशी संबंधित असलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांसंदर्भात तक्रारी आहेत.

नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यात प्रामुख्याने गावांमध्ये अंत्यसंस्कारांसाठी तातडीने स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, ग्रामीण भागांत वीज व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,

तसेच व्यायामशाळांत साहित्य उपलब्ध करून द्यावे, सभामंडप, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री भुसे यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT