सौ.भारती.jpg 
नाशिक

'आत्मनिर्भर' होण्यासाठी धडपडतेय राजा-राणीची जोडी...संघर्षाने आली संसाराला गोडी!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : सिडकोच्या उपेंद्रनगर येथे भाड्याच्या घरात राहून आयुष्य जगताना दररोज संकटांशी सामना ठरलेला...हातावरचे पोट घेऊन सुरू असलेला संसार...अशा परिस्थितीत ते संसाराचे चाके थांबली नाही. कॉलनीतील विविध ठिकाणच्या घरची धुणे भांडी व स्वयंपाक करणारी पत्नी, व स्वतः प्लॅस्टिकच्या वस्तू विकून संसाराची पाऊलवाट सुरू होती. अचानक कोरोना आला आणि संसार अडगळीत पडल्यागत झाला...पण त्यांची हिंमत नाही हरली... 

त्यांचा आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न...

प्लॅस्टिकच्या वस्तू हातगाडीवर विकणारे विश्वनाथ भारती व कष्टाची मोल मजुरी करणारी सौ. भारती कुठेही थांबले नाही. आत्मनिर्भर होत एक पाऊल टाकत हातगाडी वर भाजीपाला विक्री करण्याचे ठरवले. कोरोनामुळे अनेक कामगारांसह व्यावसायिकांना हादरे बसले. लॉकडाऊनमूळे विविध व्यवसायांना खीळ बसली तर बरेच रोजगार बुडाले. हातवर पोट असणाऱ्या लोकांचे बहाल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर संदर्भात वार्तालाप केल्यानंतर सिडकोच्या उपेंद्र नगर विश्वनाथ भारती व त्यांच्या पत्नी सौ. भारती यांनी लॉकडाऊनच्या काळात व्यवसायात परिवर्तन करत भाजीपाला विक्री करण्याचा दृष्टीने पाऊले उचत आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला. प्लॅस्टिकच्या वस्तू विकणारे विश्वनाथ भारती व घरकाम करणाऱ्या पत्नीने भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेतला. घरकाम व रुचकर जेवण बनवणाऱ्या सौ. भारती आणि प्लॅस्टिक वस्तू विक्री करणारे त्यांचे पती विश्वनाथ यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित सुरु होता. परंतु कोरोनामूळे त्यांच्या कामाला खीळ बसली. 

डोक्यावर कर्ज, बँकेचे हप्ते, घर खर्च अशा बिकट परिस्थितीत घरासाठी न मिळणारे रेशन या सर्व समस्यांचा विचार करत हाताची घडी करून विचार करत बसण्यापेक्षा भाजीपाला विक्रीचा पर्यायी मार्ग शोधला आणि हातगाडीवर भाजीपाला विक्रीला सुरवात केली. भाजी घ्या भाजीचा आवाज करणाऱ्या विश्वनाथ भारती यांच्या भाजी घेणारे गोळा होतात. खेड्यापाड्यातुन आलेल्या शेतकऱ्यांकडून भल्यापहाटे ते स्वच्छ भाजीपाला विकत घेतात. भाजीपाला खरेदी करणाऱ्या लोकांना खात्रीलायक भाजीपाला मिळत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. खर्च वजा जाता मिळणाऱ्या पैशातून ते आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT