police esakal
नाशिक

पोलिसांच्या तावडीतून पळाला पण जिवाला मुकला; CIDचौकशीची मागणी

सुहास वैद्य

कोल्हार (जि.अहमदनगर) : राज्य उत्पादन शुल्क (State excise duty) विभागातील, गुन्ह्यात अटकेतील आरोपी (suspected) जनार्दन चंद्रय्या बंडीवार (वय ४६, रा. राहाता) याचा (ता.३) सकाळी सव्वानऊच्या सुमारास बाभळेश्वरच्या चौकात ट्रेलरची धडक बसून मृत्यू (death) झाला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे पोलिस अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. याबाबत मृताच्या नातलगांनी व मित्रांनी मात्र, बंडेवार याचा मृत्यू अपघाती नसून त्याचा घातपात झाला असल्याचा संशय माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सीआयडी (CID) चौकशी करण्याची मागणी मृताच्या आप्तेष्टांनी केली आहे. (question-about-suspected-death-crime-marathi-news-jpd93)

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी - आरोपी जनार्दन बंडीवार याचा राहाता येथे ताडीविक्रीचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. तीन दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्याला उत्पादन शुल्क विभागातील बाभळेश्वरच्या कार्यालयातून बसस्थानकात लघुशंकेसाठी नेले असता, अटकेतील आरोपी बंडेवार यास ट्रेलरची (एचआर ३८ व्ही ३०९६) धडक बसली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक नंदू चिंधू परते (कोपरगाव विभाग) यांनी याप्रकरणी खबर दिली असून, लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच, मृतदेहावर राहाता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यामार्फत इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, राज्य उत्पादन शुल्कचे पोलिस अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक एन .बी. शेंडे, लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

यासंदर्भात राहात्याचे सामाजिक कार्यकर्ते वीरेश मखाणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की दोन दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क विभागातून बंडीवार यास फोन आला. त्याचा ताडीविक्रीचा व्यवसाय बंद असतानासुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल केला. राज्य सरकारनेही ताडीविक्री बंद केली आहे, तरीही केस अंगावर घेण्यासाठी उत्पादन शुल्कच्या एका अधिकाऱ्याने त्याला बोलावून घेतले. त्याच्यावर दबाव आणला. त्याला बाभळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये ठेवून तेथे मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तो कोठडीतून पळल्याचा व अपघाताचा खोटा बनाव पोलिसांनी रचला आहे. पैशासाठी त्याचा खून केल्याचा आमचा आरोप आहे. या प्रकरणाचा योग्य तपास लावा. दोषींवर योग्य ती कारवाई करावी, त्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा इशारा मखाणा यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT