shivsena bjp esakal
नाशिक

नाशिक : राजीव गांधी भवन विकायला काढणार का? शिवसेनेचा सवाल

विक्रांत मते

नाशिक : शहरातील महापालिकेच्या (nashik muncipal corporation) मालकीच्या २२ मोकळ्या भूखंडांचा बीओटीवर विकास करण्याच्या निर्णयाला विरोधी पक्ष शिवसेनेने (shivsena) जोरदार विरोध केला असून, मोक्याच्या व महागड्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठीच अशासकीय ठराव मंजूर केल्याचा आरोप करताना राजीव गांधी भवन (rajiv gandhi bhavan) महापालिका मुख्यालय विकत घेण्यासाठी ठेकेदार मिळाला, तर तेही विकणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. या विषयावर महासभेत मतदानाची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बीओटीवर भूखंड विकासाला विरोध

गेल्या महिन्यात झालेल्या ऑनलाईन महासभेत जादा विषयांमध्ये शहरातील २२ मिळकतींचा ‘बांधा, वापरा व हस्तांतरित’ करा या तत्वावर विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा विषय अशासकीय असताना, विनाचर्चा मंजुरी देण्यात आल्याने त्याचवेळी शिवसेनेने विरोध केला होता. आता पुन्हा विरोधी पक्षनेते बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर सत्ताधारी भाजपवर शाब्दीक हल्ला केला. ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून भाजपने आतापर्यंत कारभार केला आहे. बीओटीवर जागांचा विकास करण्याबरोबरच घंटागाडी, महिला प्रशिक्षण हे त्यातीलच विषय. शहराचे भवितव्य ठरविणाऱ्या या विषयांवर महासभेत चर्चा होणे अपेक्षित असताना, मागच्या दाराने विषय मंजूर करून उखळ पांढरे करण्याचे उद्योग सुरू आहे. धोरणात्मक विषयांवर चर्चा करण्याची भाजपला भिती का वाटते, असा सवाल करताना यात काळेबेरे असल्यानेच असे उद्योग भाजपकडून सुरू आहेत. महापालिकेला खड्ड्यात घालणारा कारभार आता सहन केला जाणार नाही, या विषयावर येत्या महासभेत मतदान घेण्याची मागणी केली.

आयुक्त, महापौर मिलिजुली

वास्तविक धोरणात्मक विषयांवर अशासकीय ठराव रद्द केले जातात. मात्र, आयुक्त कैलास जाधव यांनी बीओटीच्या अशासकीय ठरावावर चुप्पी साधल्याने बिल्डरांच्या घशात मिळकती घालण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्तांची मिलीजुली असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muktainagar News : मुक्ताईनगरात गुलाल उधळला! आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील नगराध्यक्षपदी विजयी

Vasai Virar Election : चिन्हांच्या खेळात अडकली महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडीची युती; वसई-विरारमध्ये राजकीय गोंधळ उभा!

अलिबागमधील 'या' गावात आहे रवी जाधव यांचं टुमदार फार्महाउस; फोटो पाहिलेत का? कासवाशी संबंधित आहे घराचं नाव

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण आणि सुटका

Viral Video : ''मॅडम माझ्या मुलीला मारू नका, तिला आई नाहीये'', भर वर्गात वडीलांना अश्रू अनावर; बाप-लेकीचा भावूक करणारा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT