Blooming wheat crop in Tringalwadi area as rabi crops get respite from severe winter. esakal
नाशिक

Nashik News : थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा; आठवडेबाजारावर परिणाम

इगतपुरी शहरासह तालुक्यात शीतलहरीमुळे तापमानाचा पारा १२ ते १३ अंशांपर्यंत खाली घसरला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इगतपुरी शहरासह तालुक्यात शीतलहरीमुळे तापमानाचा पारा १२ ते १३ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याबरोबरच इगतपुरी तालुक्यात चांगलाच प्रभाव जाणवत आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचा प्रचंड कडाका वाढल्यामुळे घोटी-इगतपुरीकरांना हुडहुडी भरली आहे. ()

सकाळी आणि रात्री ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत, तर सर्वाधिक वर्दळीचा मुंबई-आग्रा महामार्गसुद्धा सध्या मंदावला आहे. तर तालुक्याच्या विविध भागांत जनजीवनावर याचा परिणाम दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वत्र शीतलहरी कायम असल्या तरी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात याचा प्रभाव वाढला आहे.

त्याचा परिणाम सध्या सर्वत्र जाणवत आहे. त्यामुळे काही भागात थंडीची लाट पसरली आहे. यामुळे तालुक्यातील शेतीच्या कामकाजावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. थंडीची तीव्रता इगतपुरी परिसरात वाढत असल्याने सकाळीऐवजी दुपारी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे.

त्यातच पहाटे जॉगिंग व व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची वर्दळही कमी झाली आहे. शेकोटीचा आधार घेणे अनेक जण पसंत करत आहेत. थंडीमुळे दैनंदिन व्यवहार मंदावलेले आहेत. दारणा धरण परिसरात सकाळच्या सुमारास पाखरं मुक्तछंद होऊन शुद्ध हवेचा आणि मुक्त व आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटत आहेत.

रब्बी हंगामातील पिकांना मिळाला दिलासा

सद्यःस्थितीत तालुकाभरात रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीला सुगीचे दिवस आले आहेत. काही भागांत विविध पिकांच्या लागवडीला उशीर झाला असला तरी, गहू, हरभरा, मसूर, उडीद, गावठी वाटाणा या पिकांसह टोमॅटो, काकडी, मिरची, दोडका, शिमला मिरची यांसारख्या नगदी पिकांच्या लागवडीने सर्वत्र वेग घेतला आहे. तसेच कडाक्याच्या थंडीने रात्री पडणाऱ्या दवामुळे व गारठ्यामुळे गूह, हरभरा, मसूर या पिकांना दिलासा मिळत आहे.

त्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. थंडीने या हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे आता शेतकरीवर्ग हंगामासाठी सरसावला आहे. त्यातच यंदाच्या मोसमात समाधानकारक पाऊस झालेला असल्याने शेतशिवारातील विहिरी भरलेल्या असून, रब्बी हंगामात भरघोस उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : आष्टीत पुरामुळे इमारतीवर अडकलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT