race champion Shiva ox dead by heart attack
race champion Shiva ox dead by heart attack  esakal
नाशिक

एकही शर्यत न हरलेला शिवा आयुष्याशी मात्र हरला

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : एखादी बैलगाडा शर्यत असली की, शिवा हमखास पहिला येणार यात काही शंकाच नव्हती. मालक रामभाऊ गायकवाड यांना शिवाने एकही शर्यत न हारता जवळपास ३५ शर्यती जिंकून दिल्या होत्या. त्यामूळे नाशिक जिल्हयातील बैलगाडा शर्यत शौकीनांमध्ये 'शिवा' ची चांगली ओळख निर्माण झाली होती. त्यात हस्ते दुमाला पंचक्रोशीत तो 'जीवा भावाचा शिवा' झाला होता. परंतु, गायकवाड कुटुंबासोबतचा शिवाचा सहवास २३ सप्टेंबरच्या पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास संपला.

जीवा भावाचा 'शिवा' गेल्याने कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर

बैलगाडा शर्यतीत गुलालाची उधळण अंगावर घेवूनच घरी परतणारा व हस्ते दुमाला (ता. दिंडोरी) पंचक्रोशितील नागरिकांचा जीवा भावाचा झालेला 'शिवा' या बैलाचे अचानक ह्दयविकाराच्या धक्याने निधन झाले. कुटुंबातील सदस्याप्रमाणे 'शिवा' वर जीवापाड प्रेम करणाऱ्या रामभाऊ गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आपल्या लाडक्या व पराक्रमी बैलावर आपल्या मळ्यातच कुटूंबातील व्यक्तीप्रमाणेच अतिशय शोकाकूल वातारणात कुटूंबातील सदस्यांनी मुंडन करीत विधीवत दशक्रिया विधीचा कार्यक्रम केला.

...आणि अचानक तो जमिनीवर कोसळा

हस्ते दुमाला, ता. दिंडोरी येथील रामभाऊ काळू गायकवाड, पोपट काळू गायकवाड यांनी (गंगापूर, ता. वैजापूर) येथील बाजारातून शिवाला (बैल) सव्वा लाखाला विकत घेतलं होतं. रामभाऊ यांना वडील काळू गायकवाड यांच्यापासून बैलगाडा शर्यतीची हौस होती. त्यामूळे बैल व घोडा त्यांच्याकडे पूर्वीपासून असायचेच. मात्र शिवाच्या पाय गुणाने त्यांच्या कुटुंबात सकारात्मक व आनंददायी घटना घडल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीचे त्याच्यावर जीवापाड प्रेम जडलं. अगदी घरातील लहान मुलाला सांभाळतात तसा त्याचा सांभाळ केला. शिवाला देखील घरातील व्यक्तींचा लळा लागला होता.

रामभाऊ गायकवाड यांच्या दगडी माळ भागातील मळ्यात घराशेजारीच असलेल्या गोठ्यात त्याची अचानक तब्बेत बिघडली सर्व कुटुंबीयांसमोरच 'शिवा' जमिनीवर कोसळला. आणि गायकवाड कुटुंबीयांनी एकच हांबरडा फोडीत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

यानंतर त्यांनी घरातील एका सदस्याप्रमाणे आपल्या शेतातच व्यक्तिप्रमाणेच अंत्यविधीचे सोपस्कार पार करुन दफनविधी केला. त्यानंतर ता. २ रोजी सकाळी ९ वाजता गायकवाड कुटुंब, नातेवाईक व पंचक्रोशितील ग्रामस्थ, आदर्श मित्र मंडळाचे सदस्य असे जवळपास अडीचशे नागरिकांच्या उपस्थित दशक्रिया विधी संपन्न झाला. यावेळी गायकवाड कुटुंबीयातील वीस सदस्यांनी मुंडन केले. नातेवाईकांनी गायकवाड कुटुंबीयांना टोपी टॉवेलचा दुखवटा चढवून लाडक्या शिवाच्या प्रतिमेचे पुजन करुन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पन केली. यानंतर दशक्रिया विधीसाठी आलेल्यांना बुंदी, वरण- भात, पुरी भाजी असा मेनू असलेल्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी बाळासाहेब महाले, धनराज महाले, रमेश शिंदे, केशव राऊत, रमेश महाले, रमेश गवळी, आत्माराम महाले, विलास महाले, सोनू बागूल आदी आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रतिष्ठीत उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT