duplicates notes surgana esakal
नाशिक

सुरगाण्यातून गुजरातमध्ये पोचविल्या जायच्या नकली नोटा

सकाळ डिजिटल टीम

सुरगाणा (जि.नाशिक) : सुरगाणा तालुक्यात नकली नोटांचे रॅकेट असल्याचे उघड झाले आहे. गुजरातच्या सीमावर्ती भागात या नोटा छापल्या जात असून, गुजरातमध्ये त्या पोचविल्या जातात. गुजरात पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. (racket-of-duplicates-notes-in-Surgana-exposed-nashik-marathi-news)

सुरगाण्यातील बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

गुजरात पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, तालुक्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागातील गुही, मांधा, बोरचोंड या गावातील रहिवासी संशयित असल्याचा गुजरात पोलिसांचा संशय आहे. जयसिंग, हरिदास, अनिल (एकाचे नाव अजूनही समजले नाही) हे संशयित संगणकावर नोटांचे स्कॅनिंग करून कलर प्रिंट काढून घेत असत. चारशे रुपयांत पाचशेची नोट, तर चाळीस रुपयांत पन्नासची नोट याप्रमाणे नकली नोटा व्यवहारात खपविण्याकरिता गुजरातमधील पार्थ शाह (रा. भूमी बंगला, धरमपूर जकात नाका), झिपर भोये (रा. मामाभाचे), चिंतू भुजड (रा. गडी), परशुराम पवार (रा. मुरदड) यांना कमिशनवर देत होते. धरमपूरच्या जुन्या फळ बाजारात १२ जूनला झिपर भोये याच्याकडे पाचशेच्या साठ चलनी नोटा आढळल्या. त्याची चौकशी केली असता महाराष्ट्रातील सुरगाणा तालुक्यातून नोटा चलनात आणल्याची कबुली दिली.

पाचशेच्या १४८ नोटा जप्त; गुजरात पोलिसांची कारवाई

आतापर्यंत पोलिसांनी १४८ पाचशेच्या नकली नोटा संशयितांकडून जप्त केल्या आहेत, तर १३२ बनावट नोटा अजून चलनात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित नोटा फॉरेन्सिक सायंटिफिक अधिकारी तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्या असता खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. गुजरात सीमावर्ती भागात आदिवासी समाजात असलेले अज्ञान तसेच आर्थिक दुर्बल परिस्थितीचा फायदा घेत एका नोटांच्या बंडलमध्ये चार ते पाच बनावट नोटा चलनात आणत होते. संबंधित आरोपींकडून १४८ नकली नोटा, पियाजे रिक्षा (जीजे १५, एव्ही ६७४६), चार मोबाईल, आधारकार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. सुरगाणा तालुक्यातील नकली नोटा छापणारे आरोपी फरारी आहेत. सुरत पोलिस जिल्हा अधीक्षक एस. पी. राजकुमार, वलसाड जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. राजदीपसिंह झाला, बी. जी. बारड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे जे. एन. गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक के. जे. राठोड, सी. एच. पनार, ए. जी. राठोड, के. एम. बेरिया, सय्यद वाडू आदी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT