NMC Latest News esakal
नाशिक

NMC News: राधाकृष्ण गमे रजेवर, लक्ष्मीकांत साताळकर रुजू

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आठ जूनपासून रजेवर जात असून त्यांच्या रजा कालावधीत पदभार कोणाकडे द्यावा यासंदर्भात नगरविकास विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. (Radhakrishna Game on leave Laxmikant Satalkar to join NMC Nashik news)

दरम्यान लक्ष्मीकांत साताळकर हे महापालिकेच्या प्रशासन उपायुक्त पदावर रुजू झाले आहेत तर आयुक्त पदावर शासनस्तरावरून अद्यापही नावाची निश्चिती होत नाही. आयुक्त पदाचा कार्यभार आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार मसुरी येथे प्रशिक्षणाला गेल्याने त्यांचा पदभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर पुलकुंडवार यांची साखर आयुक्तपदी बदली झाल्यानंतर गमे यांच्याकडेच आयुक्तपदाचा पदभार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान आठ जूनपासून गमे देखिल रजेवर जात असल्याने त्यांच्या पदाचा कार्यभार गुंडे यांच्याकडे सोपविला जाणार आहे.

आयुक्तपदावर नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ रघुनाथ गावडे, राज्याचे ईएसआय आयुक्त अशोक करंजकर, फिल्मसिटीचे संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सोलापूरचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत नावाची निश्चिती झालेली नाही. आयुक्त पदाचा सस्पेन्स आजही कायम राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sillod News : पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला; भराडीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT