Rahul from nashik cycle 300 km in 19 hours esakal
नाशिक

राहुलने 19 तासांत सायकलवर कापले 300 किलोमीटर अंतर

फ्रान्समधील "Audax Club Parisien' या संस्थेतर्फे संपूर्ण जगभरात ही स्पर्धा घेण्यात येते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सायकलिस्ट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेली नाशिक ते धुळे व परत नाशिकपर्यंत ३०० किलोमीटर अंतराची ‘बीआरएम’ स्पर्धा सायकलिस्ट राहुल आहिरे यांने विविध संकटे पार करत नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण केली.

फ्रान्समधील "Audax Club Parisien' या संस्थेतर्फे संपूर्ण जगभरात ही स्पर्धा घेण्यात येते. बीआरएम नावाने ओळखली जाणारी ही स्पर्धा नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने स्थानिक पातळीवर घेतली. यामध्ये नाशिक-धुळे-नाशिक असा ३०० किलोमीटरचा प्रवास २० तासांत पूर्ण करणे आवश्‍यक होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये अभियंता असलेल्या सायकलिस्ट राहुलने स्पर्धेत सहभागी होत हा ३०० किलोमीटरचा प्रवास नियोजित वेळेपूर्वी एक तास अगोदर म्हणजे १९ तासांतच पूर्ण केला. या प्रवासात राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांनाही अनंत अडचणींचा सामना करावा लागला.

संकटांची मालिका सुरूच

स्पर्धेच्या नियमांनुसार जाताना चांदवड, धुळे आणि येताना द्वारका पॉइंट येथे वेळेपूर्वी पोचणे आवश्‍यक होते. त्यानुसार राहुलने पहिल्या टप्प्यात धुळे येथील पॉइंट पूर्ण केला. मात्र, दुसऱ्या टप्प्यात परतीच्या प्रवासात पाऊस, विरुद्ध दिशेने येणारे वेगवान वारे, अंधूक लाइट, चाक पंक्चर, रात्रीची वेळ असल्याने केवळ सायकलच्या दिव्याचा अपुरा प्रकाश अशी अनेक संकटे आली. यातच खड्ड्याचा अंदाज न आल्याने चांदवडजवळ त्याचा छोटा अपघातही झाला. तेव्हा तर आता आपण स्पर्धा पूर्ण करू शकणार नाही, अशा नकारात्मक भावनाही त्याच्या मनात उद्‌भवल्या.

अडथळा थेट पंक्चरचाच

अशाही अवस्थेत स्पर्धा वेळेत पूर्ण करायचीच, असा निर्धार करत त्याने पुन्हा जोमाने प्रवास सुरू ठेवला. द्वारका पॉइंट अवघे ३५ किलोमीटरवर असतानाच पिंपळगावजवळ त्याची सायकल पंक्चर झाली. तेव्हा सीटवर न बसता उभे राहून केवळ पुढील चाकावर जास्त भार देऊन सायकल चालवली. काही वेळाने अन्य काही स्पर्धक जेव्हा जवळ आले, तेव्हा त्यांच्याकडील हॅन्डपंपाद्वारे सायकलच्या चाकात हवा भरत पुढील प्रवास सुरू ठेवला. अशा सर्व संकटांवर जिद्दीने मात करत राहुलने परतीचा प्रवास ५ तास ५० मिनिटांत पूर्ण करत स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. रात्री एक वाजून दोन मिनिटांनी राहुल अंतिम पॉइंटवर पोचला. तब्बल एक तासाची वेळ राखून त्याने ही स्पर्धा पूर्ण केली.

''तीनशे किलोमीटरचा सायकल प्रवास मला खूप काही शिकवून गेला. आयुष्यातदेखील आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, हिंमत न हारता प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो. त्यामुळे ही स्पर्धा पूर्ण करू शकलो. त्यातून इच्छाशक्ती असेल तर नक्कीच यश मिळते, याचाच प्रत्यय आला.'' - राहुल आहिरे, सायकलिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT